आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशुक्रवार, 6 जानेवारीला पौष महिन्याची पौर्णिमा आहे. पौर्णिमा हा सणही मानला जातो. या तिथीशी संबंधित अनेक परंपरा आहेत, ज्याचे पालन करून धार्मिक फायद्यांसोबत आरोग्य लाभही मिळतात. धार्मिक कार्याने नकारात्मक विचार संपतात आणि मन शांत होते. उज्जैनचे ज्योतिषी पं. मनीष शर्मा यांच्याकडून जाणून घ्या पौर्णिमेशी संबंधित अशा काही परंपरा, ज्या प्राचीन काळापासून प्रचलित आहेत...
पौर्णिमेला तीर्थदर्शन आणि नदी स्नान
या सणाला अनेक लोक तीर्थयात्रा आणि नदी स्नानाची परंपरा पाळतात. त्यामुळे गंगा, यमुना, शिप्रा, नर्मदा, अलकनंदा यासह देशातील सर्व पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक पोहोचतात. यासोबतच पौराणिक महत्त्व असलेल्या मंदिरांमध्ये दर्शन घ्यावे. पौराणिक मंदिरे जसे की 12 ज्योतिर्लिंगे, 51 शक्तीपीठे, चार धाम इ.
गरजू लोकांना आवश्यक वस्तू दान करा
आता थंडीचा काळ आहे. या दिवसात लोकरीच्या कपड्यांचे दान करावे. गरजू लोकांना अन्नधान्य, पादत्राणे, कपडे आणि पैसे दान करावेत. शक्य असल्यास एखाद्या व्यक्ती घरी बोलावून जेवू घालावे. गरजू लोकांना सामर्थ्यानुसार धन दान करावे.
भगवान सत्यनारायणाची कथा वाचावी आणि ऐकावी
पौर्णिमेला सत्यनारायणाची कथा वाचण्याची आणि ऐकण्याची परंपरा खूप प्रचलित आहे. सत्यनारायण हे भगवान श्रीविष्णूचे रूप आहे. त्याची कथा स्कंद पुराणातील रेवाखंडात आहे. कथेमध्ये पाच अध्याय, 170 श्लोक आणि 2 विषय आहेत. पाहील विषय संकल्प न विसरण्याचा आणि दुसरा प्रसादाचा अपमान न करण्याचा. सत्यनारायण कथेत सांगितले आहे की, नेहमी सत्य बोलावे आणि देवाच्या प्रसादाचा अनादर करू नये. कथेतील या गोष्टी आपल्या जीवनात आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा.
भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा अभिषेक
पौर्णिमेला श्रीविष्णु आणि महालक्ष्मीचा विशेष अभिषेक करावा. दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक केल्यास उत्तम राहते. अभिषेक झाल्यानंतर देवाला नवीन वस्त्रे घालावीत, फुलांनी सजवावेत. दिवा लावावा. ऊँ नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. मिठाईचा नैवद्य दाखवून आरती करावी.
हनुमानासमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा
पौर्णिमेच्या संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतर बजरंगबलीची पूजा करावी. दीप प्रज्वलित करून हनुमान चालिसाचा पाठ करावा. ऊँ रामदूताय नमः या मंत्राचा जप करावा. मंत्राचा किमान १०८ वेळा जप करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.