आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र:पौर्णिमेला चंद्राला द्यावे अर्घ्य, चंद्र ग्रहाचे दोष होऊ शकतात दूर

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 6 जानेवारीला पौष महिन्याची पौर्णिमा आहे. या तिथीला संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्रदेवाला अर्घ्य द्यावे. यासाठी चांदीच्या कलशात दूध भरून चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यादरम्यान ऊँ सों सोमाय नम: या चंद्र मंत्राचा जप करावा.

उज्जैनचे ज्योतिषी पं. मनीष शर्मा यांच्या मते, नऊ ग्रहांपैकी चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह आहे. चंद्र दर अडीच दिवसांनी राशी बदलतो. चंद्र कर्क राशीचा स्वामी असून आपल्या मनाचा कारक आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राची स्थिती ठीक नसते, त्यांना आईकडून सुख मिळत नाही. अशा लोकांचे मन एकाग्र राहत नाही. चंद्राचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो.

चंद्रदेव हे अनसूया आणि अत्रि मुनी यांचे पुत्र
धर्मग्रंथानुसार ब्रह्मदेवाने आपला मानस मुलगा ऋषी अत्रीला उत्पन्न केले होते. कर्दम मुनींची कन्या अनसूया हिच्याशी अत्री ऋषींचा विवाह झाला होता. अत्री आणि अनसूया यांना तीन पुत्र झाले. दुर्वासा ऋषी, भगवान दत्तात्रेय आणि सोम म्हणजेच चंद्र.

चंद्रदेव यांचा विवाह दक्ष प्रजापतीच्या 27 मुलींशी झाला होता. या मुलींच्या नावावर 27 नक्षत्रांचा उल्लेख आहे. या 27 नक्षत्रांपैकी चंद्र जेव्हा एक फेरी घेतो तेव्हा एक हिंदी मास पूर्ण होतो.

पौर्णिमेला चंद्रासाठी करावे दूध दान
पौर्णिमेला चंद्रासाठी दूध दान करावे. यासोबतच पांढरे वस्त्र दान करावे. शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करून पांढऱ्या फुलांनी शिवलिंगाचा शृंगार करावा.

बातम्या आणखी आहेत...