आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नान-दानाचा उत्सव:शुक्रवारी पौष पौर्णिमेला जुळून येणार 5 शुभ योग,  शुभ कर्मांचे मिळेल पूर्ण फळ

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पौष महिन्याच्या पौर्णिमेला स्कंद आणि भविष्य पुराणात उत्सव म्हटले आहे. यावेळी ही पौर्णिमा 6 जानेवारीला आहे. या तिथीला स्नान, दान, श्राद्ध आणि श्रीविष्णूची पूजा करण्याचे विधान शास्त्रात सांगितले आहेत. या दिवशी तिथी, वार आणि ग्रह-नक्षत्राने पाच शुभ योग तयार होत आहेत. त्यामुळे हा दिवस खरेदीसाठी आणि नवीन सुरुवातीसाठी खास राहील.

या तिथीला भगवान श्रीविष्णू आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते. तीर्थक्षेत्र किंवा पवित्र नद्यांच्या पाण्याने स्नान केले जाते. या दिवशी केलेले दान आणि उपवास अक्षय फळ देतात. या दिवशी चंद्र पूर्ण असतो म्हणजेच त्याच्या 16 कलांसह. त्यामुळे या दिवशी केलेल्या शुभ कर्मांचे पूर्ण फळ मिळते.

ग्रह-ताऱ्यांचा शुभ संयोग
या दिवशी चंद्र अर्द्रा नक्षत्रात राहील. यामुळे दिवसभर पद्म नामाचा शुभ योग राहील. ब्रह्मा आणि इंद्र नावाचा शुभ योगही या दिवशी असेल. दुसरीकडे सूर्य आणि बुध धनु राशीत असल्यामुळे बुधादित्य आणि तिथी, वार, नक्षत्र सर्वार्थ सिद्धी योग तयार करत आहेत. या दिवशी गुरु आणि शनी आपापल्या राशीत असतील. नक्षत्रांची ही स्थिती आनंददायी आणि समृद्ध असेल. या दिवशी केलेल्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता अधिक वाढेल. या शुभ संयोगात स्नान आणि दान केल्याने अनेक पटींनी फळ मिळते.

तीर्थस्नान आणि पितृपूजा उत्सव
पौष पौर्णिमेला भारतीय संस्कृतीत खूप महत्त्व आहे. या दिवशी गंगा किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीच्या पाण्यात स्नान करून भगवान श्रीविष्णू आणि सूर्याची पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात. या पौर्णिमेला पितरांची विशेष पूजा आणि ब्राह्मण भोजन केले जाते. यामुळे पितर संतुष्ट होतात. या सणाला सौभाग्य आणि समृद्धीसाठी भगवान श्रीविष्णू-लक्ष्मीची विशेष पूजा आणि उपवास केला जातो.

पौर्णिमेचे स्वामी स्वतः चंद्रदेव
या सणाच्या दिवशी सूर्य आणि चंद्रामध्ये 169 ते 180 अंशांचे अंतर राहते. यामुळे हे ग्रह समोरासमोर येतात आणि त्यांच्यामध्ये समसप्तक योग तयार होतो. पौर्णिमेला चंद्र आपल्या सोळा कलांनी पूर्ण राहतो. म्हणूनच या दिवशी औषधे घेतल्याने वय वाढते. या योगात केलेल्या कामात यश मिळते.

पौर्णिमेचे स्वामी स्वतः चंद्रदेव आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राचा प्रभाव आपल्या मनावर पडतो. शुक्रवारी आणि पौर्णिमा तिथीला शुभ संयोगात केलेली कामे सुख, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येतात.

बातम्या आणखी आहेत...