आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजपासून पितृपक्ष सुरु:तीर्थक्षेत्रावर जाऊन श्राद्ध करणे शक्य नसल्यास घरीच या सोप्या विधीने करू शकता श्राद्ध

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरीच करू शकता श्राद्ध आणि तर्पण

2 ते 17 सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष राहील. धर्मग्रंथानुसार तीर्थक्षेत्रावर जाऊन श्राद्ध करण्याचे विशेष महत्त्व आहे परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे तीर्थक्षेत्रावर जाऊन श्राद्ध करणे शक्य नसल्यास विशेष गोष्टींच्या मदतीने सोप्या पद्धतीने घरीच श्राद्ध केले जाऊ शकते.

श्राद्धामध्ये आवश्यक गोष्टी

घरीच करू शकता श्राद्ध आणि तर्पण
- श्राद्ध असलेल्या तिथीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि श्राद्धकर्म होईपर्यंत काहीही खाऊ नये. केवळ पाणी पिऊ शकता.
- दुपारी 12 च्या जवळपास श्राद्ध करू शकता.
- दक्षिण दिशेला मुख करून डाव्या पायाचा गुढगा जमिनीला टेकवून बसावे.
- त्यानंतर तांब्याचे खोलगट भांडे घेऊन त्यामध्ये जवस, तीळ, गाईचे कच्चे दूध, गंगाजल, पांढरे फुल आणि पाणी टाकावे.
- हातामध्ये दर्भ, कुश (एक प्रकारचे गवत) घेऊन पाणी हातामध्ये घेऊन उजव्या हाताच्या अंगठ्याने तांब्याच्या भांड्यात पाणी सोडावे. ही प्रक्रिया 11 वेळेस करत पितरांचे ध्यान करावे.
- महिलांनी शुद्ध होऊन पितरांसाठी भोजन तयार करावे.
- पितरांसाठी अग्निमध्ये खीर अर्पण करावी. त्यानंतर पंचबली म्हणजे देवता, गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्यांसाठी भोजन सामग्री वेगळी काढून ठेवावी.
- त्यांनतर ब्राह्मणांना जेवू घालावे आणि श्रद्धेनुसार दक्षिणा, इतर सामग्री दान करावी.

श्राद्ध म्हणजे पितृ यज्ञाचे 16 दिवस
अथर्ववेदानुसार सूर्य कन्या राशीमध्ये असल्यास पितरांना तृप्त करणाऱ्या गोष्टी दिल्याने स्वर्ग प्राप्त होतो. यासोबतच याज्ञवल्क्य स्मृती आणि यम स्मृतीमध्येही सांगण्यात आले आहे की, या 16 दिवसांमध्ये पितरांसाठी विशेष पूजा आणि दान करावे. याव्यतिरिक्त पुराणांनुसार ब्रह्म, विष्णू, नारद, स्कंद आणि भविष्य पुराणामध्ये श्राध्दपक्षात पितरांची पूजा काशाप्रकारे करावी याविषयी सांगण्यात आले आहे. ग्रंथांनुसार पितृपक्ष सुरु होताच पितृ मृत्युलोकात आपल्या वंशजांना पाहण्यासाठी येतात आणि तर्पण ग्रहण करून परत जातात. यामुळे या काळात पितरांच्या तृप्तीसाठी तर्पण, पिंडदान, ब्राह्मण भोजन आणि इतर प्रकारचे दान केले जातात.