आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पितृपक्ष 2 सप्टेंबरपासून:पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानासोबतच गूळ, तूप, धान्य, काळे तीळ, भूमी, मीठ, वस्त्र इ. गोष्टींचे करावे दान

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पितृ पक्षामध्ये करावेत हे शुभ काम

2 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरु होत आहे. पितरांचे स्मरण करण्याचा हा पक्ष 17 सप्टेंबरपर्यंत चालेल. या काळात पितरांसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान इ. शुभ कर्म केले जातात. जे लोक पितरांसाठी पुण्य कर्म करतात त्यांच्या घरात सुख-समृद्धी कायम राहते.

या गोष्टींचे करू शकता दान
श्राद्ध पक्षामध्ये गूळ, तूप, धान्य, गाय, काळे तीळ, भूमी, मीठ, वस्त्र इ. गोष्टींचे दान करू शकता. या गोष्टी दान केल्याने वेगवेगळे फळ प्राप्त होते. गूळ दान केल्याने घरातील क्लेश दूर होतो, गाय दानाने सुख-समृद्धी वाढते. तुपाचे दान केल्याने शक्ती वाढते. धान्य दान केल्यास घरात धन-धान्य कमी पडत नाही. भूमी दान केल्याने धन-संपत्ती वाढते. काळे तीळ दान केल्याने आरोग्य लाभ होतो.

पितृ पक्षामध्ये करावेत हे शुभ काम
पितृ पक्षामध्ये गरीब आणि गरजू लोकांना जेवू घालावे. धन आणि ध्यान दान करावे. सध्या पावसाळा सुरु असून, या काळात अनेक लोकांना रोजगार मिळत नाही. अशा लोकांसमोर खाण्याचे संकट उभे राहते. अशा लोकांची मदत करण्यासाठी धान्य, धन, फळ, कपडे या गोष्टींचे दान करावे. दान केल्याने पितरांची विशेष कृपा प्राप्त होते.

- ज्या लोकांना पितृ पक्षामध्ये विधिव्रत श्राद्ध कर्म करणे शक्य नसेल त्यांनी एखाद्या पवित्र नदीमध्ये काळे तीळ वाहून तर्पण करावे. परंतु यावर्षी कोरोनामुळे घराबाहेर पडणे शक्य नसल्यास मंदिरात किंवा एखाद्या ब्राह्मणाला काळे तीळ दान केल्यानेही पुण्यफळ प्राप्त होते.