आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून पितृपक्ष:घरी श्राद्ध कसे करावे; कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही, त्यांच्या शांतीसाठी जाणून घ्या विधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

20 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत पितृपक्ष राहील. या काळात पितरांच्या तृप्तीसाठी श्राद्ध केले जाते. धर्मग्रंथांमध्ये यात्रार्थ श्राद्ध म्हणजे तीर्थस्थानांवर जाऊन श्राद्ध करण्याचे महत्त्व सांगितले गेले आहे, परंतु कोरोना महामारीमुळे घरतीच सहज पद्धतीने श्राद्ध करता येऊ शकते.

यावेळी महामारीमुळे अनेक लोकांचा अंत्यसंस्कार विधिपूर्वक करणे शक्य झाले नाही. अशा लोकांच्या आत्मा शांतीसाठी ग्रंथांमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. जे घरीच केले जाऊ शकतात.

श्राद्धातील आवश्यक गोष्टी
तर्पण, पिंडदान आणि ब्राह्मण भोजन, या तीन गोष्टी श्राद्धात विशेष आहेत. पूजेच्या सर्व आवश्यक गोष्टींव्यतिरिक्त, विशेषतः स्वच्छ भांडी, जवस, तीळ, तांदूळ, कुशा गवत, दूध आणि पाणी तर्पणसाठी आवश्यक आहे. पिंड दानासाठी, तर्पण, तांदूळ आणि उडीद पिठ आवश्यक आहे. त्याचबरोबर ब्राह्मण अन्नासाठी लसूण-कांदा आणि कमी तेल, मिरची-मसाल्याशिवाय सात्विक अन्न तयार करावे. ज्यामध्ये हविष्य अन्न अर्थात भात असावा, म्हणून श्राद्ध पक्षात खीर बनवली जाते.

घरीच अशाप्रकारे करू शकता श्राद्ध आणि तर्पण

  • श्राद्ध असलेल्या तिथीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि श्राद्धकर्म होईपर्यंत काहीही खाऊ नये. केवळ पाणी पिऊ शकता.
  • दिवसाचा आठवा मुहूर्त म्हणजे कुतूप काळात श्राद्ध करावे. जो 11:36 ते 12:34 पर्यंत राहतो.
  • दक्षिण दिशेला मुख करून डाव्या पायाचा गुढगा जमिनीला टेकवून बसावे.
  • त्यानंतर तांब्याचे खोलगट भांडे घेऊन त्यामध्ये जवस, तीळ, गाईचे कच्चे दूध, गंगाजल, पांढरे फुल आणि पाणी टाकावे.
  • हातामध्ये दर्भ, कुश (एक प्रकारचे गवत) घेऊन पाणी हातामध्ये घेऊन उजव्या हाताच्या अंगठ्याने तांब्याच्या भांड्यात पाणी सोडावे. ही प्रक्रिया 11 वेळेस करत पितरांचे ध्यान करावे.
  • महिलांनी शुद्ध होऊन पितरांसाठी भोजन तयार करावे.
  • पितरांसाठी अग्निमध्ये खीर अर्पण करावी. त्यानंतर पंचबली म्हणजे देवता, गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्यांसाठी भोजन सामग्री वेगळी काढून ठेवावी.
  • त्यांनतर ब्राह्मणांना जेवू घालावे आणि श्रद्धेनुसार दक्षिणा, इतर सामग्री दान करावी.

यावेळी महामारीमुळे अनेक लोकांचा अंत्यसंस्कार विधिपूर्वक करणे शक्य झाले नाही. त्यांच्यासाठी याज्ञवल्क्य स्मृती आणि बौधायनच्या ग्रंथपितृमेधसुरतमध्ये पुत्तल-दाह क्रिया सांगण्यात आली आहे.

  • यामध्ये श्राद्धपक्ष काळात मृत व्यक्तीच्या मृत्यू तिथीला उडदाच्या पीठाने त्या व्यक्तीचा पुतळा बनवून विधिपूर्वक दाह संस्कार केला जातो.
  • त्यानंतर त्याच्यासाठी पिंडदान केले जाते. त्यानंतर सर्वपितृ अमावास्येला त्या व्यक्तीचे श्राद्धही केले जाते.
  • ज्या लोकांचा अंत्यसंस्कार विधिपूर्वक झाला नसेल, त्यांच्या आत्मा शांतीसाठी ग्रंथांमध्ये सूर्य पूजा सांगण्यात आली आहे.

निर्णय सिंधूमध्ये 12 प्रकारच्या श्राद्धाचा उल्लेख आढळून येतो
नित्य श्राद्ध
: कोणताही व्यक्ती, अन्न, जल, दूध, कुश, पुष्प आणि फळाने दररोज श्राद्ध करून पितरांना प्रसन्न करू शकतो.

नैमित्तक श्राद्ध- हे श्राद्ध विशेष निमित्ताने केले जाते. उदा. पिता, किंवा एखाद्या मृत्यूच्या तिथीच्या दिवशी याला एकोद्दिष्ट म्हटले जाते. यामध्ये विश्वदेवाचे पूजन केले जात नाही, केवळ एक पीडनदान केले जाते.

काम्य श्राद्धः एखाद्या विशेष इच्छापूर्तीसाठी हे श्राद्ध केले जाते. उदा. पुत्र, धनादि प्राप्तीसाठी.

वृद्धी श्राद्ध : हे श्राद्ध सौभाग्य वृद्धीसाठी केले जाते.

सपिंडन श्राद्ध- मृत व्यक्तीच्या 12 व्या दिवशी पितरांना भेटण्यासाठी केले जाते. हे श्राद्ध स्त्रियासुद्धा करू शकतात.

पार्वण श्राद्ध : वडील, आजोबा, पंजोबा, आजी, पणजीसाठी हे श्राद्ध केले जाते.

गोष्ठी श्राद्ध : हे श्राद्ध कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र असण्याच्या वेळी केले जाते.

कर्मांग श्राद्ध : हे श्राद्ध एखाद्या संस्कार निमित्ताने केले जाते.

शुद्धयर्थ श्राद्ध : हे श्राद्ध कुटुंबाच्या शुद्धीसाठी केले जाते.

तीर्थ श्राद्ध : हे श्राद्ध तीर्थयात्रेला गेल्यामुळे केले जाते.

यात्रार्थ श्राद्ध : हे श्राद्ध यात्रा यशस्वी होण्यासाठी केले जाते.

पुष्टयर्थ श्राद्धः शरीर स्वास्थ्य आणि सुख-समृद्धीसाठी त्रयोदशी तिथी, मघा नक्षत्र, वर्षा ऋतू, भाद्रपद मासातील कृष्ण पक्ष या श्राद्धासाठी उत्तम मानला जातो.

बातम्या आणखी आहेत...