आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

17 सप्टेंबरला अमावस्या:सर्वपितृ मोक्ष अमावास्येला ज्यांच्या मृत्यूची तिथी माहिती नसेल त्यांचे आणि इतर सर्व पितरांसाठी करावे पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमावस्या तिथीला हे शुभ कर्मही अवश्य करावेत

गुरुवार, 17 सप्टेंबरला पितृ पक्षातील शेवटची तिथी अमावस्या आहे. यालाच सर्वपितृ अमावस्या म्हणतात. या तिथीला अशा मृत व्यक्तिंसाठी पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण केले जाते ज्यांच्या मृत्यूची तिथी माहिती नसेल. यासोबतच या काळात एखाद्या मृत सदस्याचे श्राद्ध करणे राहून गेले असेल तर सर्वपितृ अमावास्येला श्राद्ध कर्म केले जाऊ शकते.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार अमावास्येला ज्ञात-अज्ञात पितरांचे पिंडदान इ. शुभ कर्म करावेत. मान्यतेनुसार पितृ पक्षात सर्व पितर देवता आपापल्या कुळातील घरामध्ये येतात आणि धूप-ध्यान, तर्पण इ. ग्रहण करतात. अमावस्येला सर्व पितर आपल्या पितृलोकात निघून जातात.

गया तीर्थ क्षेत्राचे पुरोहित गोकुळ दुबे यांच्यानुसार, घरातील एखादा व्यक्ती आपल्या कुटुंबापासून वेगळा राहत असेल, सर्व भावंडांची घरे वेगवेगळी असल्यास सर्वांनी आपापल्या घरी पितरांसाठी श्राद्ध कर्म करावेत.

अमावस्या तिथीला हे शुभ कर्मही अवश्य करावेत
> पितृपक्षातील अमावास्येला गरजू लोकांना धन आणि धान्य दान करावे. वस्त्रांचे दानही करू शकता. एखाद्या मंदिरात किंवा गोशाळेत सामर्थ्यानुसार दान करावे.

> अमावस्येच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर देवघर आणि तुळशीजवळ दिवा लावावा. मुख्य दारासमोर आणि घराच्या छतावरही दिवा लावावा. अमावास्येला चंद्र दिसत नाही आणि यामुळे रात्री अंधार आणि नकारात्मकता वाढते. दिव्याच्या प्रकाशाने घराजवळील वातावरण सकारात्मक राहते. यामुळे अमावस्याचेच्या रात्री दिवा लावण्याची परंपरा आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser