आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृपक्षात इतरांना भोजन देण्याची प्रथा:श्राद्ध कर्मानंतर ब्राह्मणांशिवाय जावई, पुतणे, मामा, गुरु यांनाही भोजन द्यावे

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या पितृपक्ष सुरू असून पितरांचे श्राद्ध कर्म करण्याचा हा महापर्व 25 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या काळात पितरांसाठी धूप-ध्यान, पिंडदान, तर्पण इत्यादी शुभ कार्ये केली जातात. या दिवसांमध्ये इतरांना जेवू घालण्याचीही परंपरा आहे.

कोलकाता येथील ज्योतिषी डॉ. दीक्षा राठी सांगतात, 'पितृपक्षामध्ये कुटुंबातील पूर्वज त्यांच्या वंशजांच्या घरी येतात. पितृपक्षानंतर ते पितृलोकाकडे परत जातात. ब्राह्मणांव्यतिरिक्त जावई, पुतणे, मामा, गुरू, नातवंडे यांनाही पितृपक्षात श्राद्ध कर्मानंतर जेवू घालावे.

प्रश्नोत्तरात जाणून घ्या पितृपक्षाशी संबंधित खास गोष्टी...

प्रश्न - पितृपक्षात कोणकोणत्या कामांपासून दूर राहावे?
उत्तर-
पितृपक्षात अधार्मिक कर्मे टाळावीत. क्रोध करू नये. घरात कलह करू नये. लोभ टाळा. इतरांबद्दल वाईट विचार करू नका. घरात आणि बाहेर कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नका. कोणत्याही प्राण्याला विशेषतः कुत्रे, गाय आणि कावळे यांना त्रास देऊ नका. त्यांच्यासाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था करा.

प्रश्न- पितरांसाठी केव्हा कोणती कामे करू शकता?
उत्तर-
पितरांसाठी धूप-ध्यान, पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध करण्यासाठी मध्यान्ह ही सर्वोत्तम वेळ आहे. याशिवाय पितरांचे ध्यान करत रोज संध्याकाळी घराबाहेर दिवा लावावा.

प्रश्न - ज्यांची मृत्यू तारीख माहित नाही त्यांचे श्राद्ध कधी करावे?
उत्तर-
पितृपक्षातील व्यक्तीच्या मृत्यू तिथीनुसार श्राद्ध विधी केले जातात. ज्या तिथीला व्यक्तीचा मृत्यू होतो त्या तिथीला श्राद्ध करावे.

  • जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची तारीख माहित नसेल तर त्याचे श्राद्ध सर्वपितृ मोक्ष अमावास्येला करता येते. यावेळी 25 सप्टेंबर रोजी ही अमावस्या आहे.
  • पंचमी तिथी (14 सप्टेंबर) रोजी अविवाहित मृत व्यक्तींचे श्राद्ध केले जाते. विवाहित महिलेची मृत्यूची तारीख माहीत नसेल तर तिचे श्राद्ध नवमी तिथीला (19 सप्टेंबर) करावे.
  • एकादशी तिथीला (21 सप्टेंबर) संन्यासींचे श्राद्ध केले जाते. चतुर्दशी तिथीला (24 सप्टेंबर), ज्यांनी आत्महत्या केली किंवा शस्त्राने अपघातात मृत्यू झाला त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते. मृत लहान मुलांचे श्राद्ध त्रयोदशी तिथीला (23 सप्टेंबर) करावे.

पितरांशी संबंधित कार्य करताना पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करणे चांगले राहते.

बातम्या आणखी आहेत...