आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये:10 सप्टेंबरपासून पितरांचे श्राद्ध आणि तर्पण करण्याचा महापर्व, या काळात दान करण्याची परंपरा

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

10 सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा असून पितृपक्ष सुरु होत आहे. पितृपक्ष 25 सप्टेंबरपर्यंत राहील. पितृपक्ष हा पितरांचे स्मरण करण्याचा, त्यांचे श्राद्ध आणि तर्पण करण्याचा महापर्व आहे. या दिवसांमध्ये गरजू लोकांना पैसे, धान्य, पादत्राणे आणि कपडे दान करण्याची परंपरा आहे.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा सांगतात, पितृपक्षात अशा गोष्टी करू नयेत, ज्यामुळे इतरांना त्रास होईल. या दिवसात लोभ, नशा, मांसाहार यांसारख्या वाईट गोष्टी टाळाव्यात. कुटुंबात आणि समाजात मोठ्यांचा अनादर होता कामा नये, हे लक्षात ठेवा. घरातील स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. या दिवसात प्रसन्न राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा.

पितृपक्षाचे अनेक सोपे नियमही आहेत. ज्यांना श्राद्ध करणे शक्य नसेल त्यांनी गरजू लोकांना अन्नधान्य व कपडे दान करावेत. प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्नाची व्यवस्था करावी. लहान मुलांना भोजन द्यावे. गायी, कुत्रे, कावळे यांच्या अन्नाची व्यवस्था करावी.

या काळात शिवलिंगाला जल अर्पण करून अभिषेक करावा. जर विधिव्रत पूजा करता येत नसेल तर शिवलिंगावर बेलाची पाने, धोत्रा फुल अर्पण करावे. दीप प्रज्वलित करून ऊँ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. भगवान विष्णूंची आराधना करून ऊँ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा.

गया येथे पितरांचे तर्पण केल्यानंतर श्राद्ध करावे की नाही

  • जयपूरचे ज्योतिषाचार्य पं. नीलेश शास्त्री यांनी सांगितले की, ब्रह्मपुराण, नागरखंड आणि धर्म सिंधु ग्रंथात असे लिहिले आहे की, एखाद्याने गयामध्ये श्राद्ध-तर्पण केले असले तरी पितृ पक्षात त्या पितराचे श्राद्ध कर्म करता येते. पितृ पक्षामध्ये कुटुंबातील सर्व पितरांचे श्राद्ध आणि तर्पण अवश्य करावे.
  • पितृ पक्षाव्यतिरिक्त प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला पितरांसाठी श्राद्ध, तर्पण, धूप-ध्यान आणि दान करावे.
  • पितृ पक्षात पितृ संहिता, पितृ गायत्री, श्रीमद् भगवद्गीता, विष्णु सहस्रनाम गजेंद्र मोक्ष यांचे पठण करावे.
  • ज्यांना काही कारणास्तव पितृ तर्पण करता येत नसेल, त्यांनी ब्राह्मणांच्या मदतीने श्राद्ध करावे.
  • या दिवसांत काळे तीळ, दूध, कुशा, गंगाजल पितळेच्या पात्रात घेऊन पिंपळाला अर्पण करावे.
बातम्या आणखी आहेत...