आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृपक्ष 10 ते 25 सप्टेंबर:जाणून घ्या, घरी श्राद्ध करण्याची सोपी पद्धत; कधी, कुठे आणि कोण करू शकते श्राद्ध

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पितृ पक्ष आजपासून सुरू झाला असून 25 सप्टेंबरपर्यंत राहील. या दरम्यान तिथींच्या फरकामुळे द्वितीया आणि तृतीया श्राद्ध 12 तारखेला केले जाईल. अशा प्रकारे पितृ पक्षाचे एकूण 16 दिवस असतील. या दिवसांमध्ये पितरांचे तर्पण करणे आणि विशिष्ट तिथीला श्राद्ध करणे आवश्यक आहे. या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध, पिंडदान आणि ब्राह्मणांना अन्नदान केले जाते.

देव, ऋषी किंवा पूर्वजांना पितरांना तृप्त करणे आणि काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण करण्याच्या प्रक्रियेला तर्पण म्हणतात. त्याचबरोबर पितरांना तृप्त करण्यासाठी पिंडदान आणि ब्राह्मण भोजन केले जाते. पवित्र नद्यांच्या काठी किंवा गया तीर्थस्थानावर श्राद्ध करण्याचे विधान आहे. हे शक्य नसल्यास घरी एकांतात किंवा गोशाळेत जाऊन करता येते.

असे करावे श्राद्ध
1.
घरी श्राद्ध करण्यासाठी श्राद्ध तिथीला सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे.
2. पितरांच्या तृप्तीसाठी स्वच्छ वस्त्र परिधान करून श्राद्ध व दानाचा संकल्प घ्यावा. श्राद्ध होईपर्यंत काहीही खाऊ नये.
3. दिवसाच्या आठव्या मुहूर्तावर म्हणजेच कुतुप काळामध्ये श्राद्ध करा. हा काळ 11.36 ते 12.24 पर्यंत असतो.
4. आपला चेहरा दक्षिण दिशेला ठेवून, आपला डावा पाय वाकवून गुडघा जमिनीवर ठेवून बसा.
5. एका रुंद तांब्याच्या भांड्यात तीळ, तांदूळ, कच्च्या गाईचे दूध, गंगाजल, पांढरी फुले आणि पाणी टाका.
6. कुशाचे गवत हातात ठेवून उजव्या हाताच्या अंगठ्याने त्याच पात्रात पाणी सोडावे. हे 11 वेळा करत असताना पितरांचे ध्यान करावे.
7. पितरांसाठी अग्नीत खीर अर्पण करावी. यानंतर पंचबली म्हणजे देवता, गाय, कुत्रा, कावळा आणि मुंगी यांच्यासाठी वेगळे अन्न काढावे.
8. ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि श्रद्धेनुसार दक्षिणा व इतर वस्तूंचे दान करावे.

या गोष्टी लक्षात ठेवा
धार्मिक मान्यतेनुसार पितृ लोक दक्षिण दिशेला आहे. यामुळे संपूर्ण श्राद्ध विधी करताना दक्षिण दिशेकडे तोंड करावे. पितृतिथीला सकाळी किंवा संध्याकाळी श्राद्ध करू नये. शास्त्रात हे निषिद्ध आहे. श्राद्ध नेहमी दुपारी करावे.

तर्पणमध्ये पितरांना दूध, तीळ, कुशा, फुले, पाणी देऊन तृप्त केले जाते. जल अर्पण केल्याने पितरांची तहान भागते, नाहीतर पितर तहानलेले राहतात. त्यामुळे श्राद्धाच्या दिवशी आवश्यक गोष्टी जमवता येत नसतील, तरी किमान पाण्याने तर्पण करावे.

पुत्र पित्याचे श्राद्ध करतो. एकापेक्षा जास्त पुत्र असल्यास ज्येष्ठ पुत्रानेच श्राद्ध करावे. मुलगा नसल्यास पत्नीने श्राद्ध करावे. जर पत्नी नसेल तर सख्खा भाऊ श्राद्ध करू शकतो. ब्राह्मणांना भोजन आणि पिंडदान केल्याने पितरांना अन्न मिळते. वस्त्र दानातून पितरांना वस्त्र दिले जातात. प्रत्येक पौर्णिमा आणि अमावास्येला पितरांसाठी तर्पण करावे.

बातम्या आणखी आहेत...