आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आध्यात्मिक:सकारात्मक विचारसरणी जीवनाचा सर्वात मोठा आधार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामचरित मानसमध्ये दशरथाच्या मृत्युप्रसंगी ‘मानस’ कार म्हणतात की रात्र शोकात गेली आणि मग महामुनी आले. येथे महामुनी म्हणजे वसिष्ठांकडे इशारा आहे. वसिष्ठ महामुनी आहेत. हा प्रसंग तुम्ही असाही समजू शकता : समाजात जे विशिष्ट आहे ते म्हणजे वसिष्ठ. इतकेच नाही, तर समाजात वरिष्ठ आहेत ते वसिष्ठ. समाजात वरिष्ठ असलेल्या व्यक्तीला ओळखणे थोडे अवघड होऊ शकते. कारण त्यांना ओळखण्यासाठी राग-द्वेषमुक्त डोळे आवश्यक आहेत. जर राग असेल तर आसक्ती होईल. त्याचप्रमाणे द्वेष असेल तर वैर निर्माण होईल.

रामचरित मानसात दशरथांच्या मृत्यूनंतर भरताला आश्वासन देताना वसिष्ठांचे आणखी एक रूप आपल्यासमोर येते, तेव्हा वसिष्ठ तिथे कसे दिसतात?

सुनहु भरत भावी प्रबल बिलखि कहेउ मुनिनाथ । हानि लाभु जीवन मरनु जसु अपजसु बिधि हाथ ।।
माझा भाऊ आणि माझे वडील गेले म्हणून भरत खूप रडला. वसिष्ठांनी भरताच्या खांद्यावर हात ठेवला आणि समजावून सांगितले- हे भरता! सहा गोष्टी नियतीच्या हातात आहेत. नफा-तोटा, जीवन-मरण, यश-अपयश…. वसिष्ठांचे हे आणखी एक रूप आहे. तथापि, या सहा गोष्टी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो तेव्हाच महामुनी असल्याचे सिद्ध होते. तोटा निर्मात्याच्या हाती आहे, परंतु जे काही आहे ते मी निश्चित केले आहे. म्हणजेच मी ही गोष्ट ठरवली आहे. ही विचारसरणी असणे म्हणजे महामुनी असणे. तुम्ही काही केले आणि त्यात तोटा झाला तर तोटा चालेल, परंतु ग्लानी चालणार नाही. तुुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा.

आइन्स्टाइन एका प्रयोगात गुंतले होते. वारंवार प्रयत्न करूनही ते अपयशी होत होते. तेव्हा त्यांचा सहकारी अनेक वेळा म्हणाला- आता हा प्रयोग सोडला पाहिजे. पण आइन्स्टाइन यांनी काही तरी निश्चित केले होते. त्यांनी आपल्या सहकाऱ्याला एवढेच सांगितले - तुझे वय फक्त २० वर्षे आहे आणि तू इतक्या लवकर म्हातारा झालास? तोटा भलेही विधात्याच्या हाती असू शकतो, पण दृढनिश्चयाने कामे करणे आपले कर्तव्य आहे.

आता नफ्याची बाब. नफाही विधात्याच्या हाती असू शकतो, परंतु शुभ कार्य आपल्या हातात आहे. आम्ही नफ्यामागे आहोत. परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक नफा शुभ नाही. प्रत्येक शुभ कार्य निश्चितच फायदेशीर ठरते. नफा आपल्या हातात नसला तरी शुभ आपल्या हातात आहे.

जीवन विधात्याच्या हातात असले तरी सहजीवन आपल्या हातात असते. संजीवनी आमच्या हातात आहे. विनोबांची सूत्रे पाहा, आपण एकत्र आहोत, सामूहिक साधना आपल्या हातात आहे. मृत्यू विधात्याच्या हाती आहे. देहाचा विलय नशिबाच्या हातातील गोष्ट होती, परंतु ‘विठ्ठल-विठ्ठल’ ही तुकारामांच्या हातची गोष्ट होती. ‘राम हरी’ ही विनोबांच्या हातची गोष्ट होती. ‘हे राम’ ही गांधीजींच्या हातची गोष्ट होती.

त्याच प्रकारे पाहा - जयजयकार श्रीरामाचा झाला, पण श्रीरामाला यश मिळताच ते त्वरित म्हणाले- हे अस्वला! हे वानरा! यशाचे श्रेय मी तुम्हाला देतो.” आज परिस्थिती अशी आहे की आपण इतरांचे यश खेचून घेतो. दुसऱ्याची चूक असली तरी क्षमाशीलतेमुळे हे अपयश आपण आपल्याकडे घेऊ शकतो. नफा-तोटा, जन्म-मृत्यू, यश-अपयश हे विधात्याच्या हाती असले तरी त्याचे इतर पैलू आपल्या हातात असतात. आणि जे आपल्या हातात आहे, ते केवळ अत्यंत विरळा महापुरुष करून दाखवतात. जे हे करू शकतात ते सर्व महामुनी आहेत. महामुनीद्वारे सकारात्मक विचार जीवनासाठी खूप मोठा आधार होऊ शकतो.

तर पुन्हा रामचरित मानसकडे परत येऊ. वसिष्ठ शोकग्रस्त वातावरणात येतात तेव्हा सर्वांना धीर देतात. सर्वांचे सांत्वान करतात. ज्याच्या जीवनात ज्ञान-विज्ञानाचे मिश्रण आहे, ज्याला ज्ञान- विज्ञानाचा अनुभव आहे, जे इतरांना सांगतात की रडू नकोस, जे आपल्या ज्ञानाने सर्वांचा शोक शांत करतात, हीच महामुनीची लक्षणे आहेत.

मोरारी बापू
आध्यात्मिक गुरू आणि राम कथाकार

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser