आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरीत स्नान पौर्णिमा उत्सव:आज सायंकाळपासून भगवान जगन्नाथाचा एकांतवास, 1 जुलैला निघणार रथयात्रा

पुरी20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरीमध्ये रथयात्रेच्या 15 दिवस आधी आज भगवान जगन्नाथ पौर्णिमा स्नान करण्यात आले. या स्नानानंतर भगवान सुमारे 15 दिवस एकांतात राहतात. या महत्त्वाच्या उत्सवात पहाटेच मूर्ती गाभाऱ्यातून बाहेर आणून स्नानाच्या मंडपात स्नान घातले. त्यानंतर भगवान दिवसभर गाभाऱ्याच्या बाहेर राहतील, त्यानंतर संध्याकाळी श्रृंगार करून 15 दिवस एकांतवासात जातील. यानंतर भगवान जगन्नाथ 1 जुलै रोजी रथयात्रेसाठी बाहेर पडतील. तोपर्यंत मंदिरातील दर्शन बंद राहणार आहे.

सुगंधित जल आणि औषधी स्नान
आज ब्रह्म मुहूर्तावर मंत्रोच्चार करत गाभाऱ्यातून स्नानाच्या मंडपात देवाच्या मूर्ती आणण्यात आल्या. यानंतर वैदिक मंत्रांनी स्नान सुरू झाले. ज्यामध्ये भगवान जगन्नाथ यांच्यासह बलभद्र आणि देवी सुभद्रा यांना सुगंधित पाण्याने भरलेल्या 108 भांड्यांमधून स्नान घालण्यात आले. स्नानासाठी पाण्याने भरलेल्या भांड्यांमध्ये विविध प्रकारची औषधी मिसळली जातात. पाण्यात कस्तुरी, केशर, चंदन यांसारखे सुगंधी पदार्थ मिसळून पाणी तयार केले जाते. सर्व देवांसाठी घागरींची संख्याही ठरलेली असते.

विहिरीचे पाणी वर्षातून एकदाच वापरले जाते
भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या पौर्णिमेला स्नानासाठी मंदिरातच उत्तर दिशेला असलेल्या विहिरीतून पाणी घेतले जाते. या विहिरीचे पाणी वर्षातून एकदाच जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेला भगवान स्नानासाठी वापरले जाते. वर्षातून फक्त याच दिवशी विहीर उघडली जाते. फक्त एक दिवस या विहिरीतून पाणी काढून ती पुन्हा बंद केली जाते.

देवाला साधा नैवेद्य आणि औषध
पौर्णिमेच्या स्नानामध्ये अधिक पाण्याने स्नान केल्याने देव आजारी पडतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे त्यांना एकांतात ठेवून औषधे दिली जाते. या दरम्यान देवाला सध्या अन्नाचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच पुढील 15 दिवस मंदिरातील दर्शन बंद करून केवळ देवाला विश्रांती दिली जाते. यानंतर भगवान बरे होतात आणि रथयात्रेला निघतात.

संध्याकाळी शृंगार
संध्याकाळी बलभद्र आणि जगन्नाथ यांचा गजशृंगार केला जातो. यामध्ये देवाचे मुख हत्तीसारखे सजवले जाते. कारण, एकदा भगवंताने भक्ताला या रूपात दर्शन दिले होते. यानंतर देवतेला पुन्हा गर्भगृहात नेण्यात येईल.

1 जुलैपासून नऊ दिवसांची रथयात्रा सुरू होणार
सुमारे 15 दिवस विश्रांती घेतल्यानंतर भगवान रथयात्रेला निघणार आहेत. जी आषाढ शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला सुरु होते. ही तिथी यावेळी 1 जुलै रोजी येत आहे. या रथयात्रेत बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्यासह भगवान जगन्नाथ वेगवेगळ्या रथांवर निघतात. त्यानंतर ते त्यांच्या मावशीच्या ठिकाणी 2 किमी अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिरात पोहोचतात. तेथे परमेश्वर सात दिवस विश्रांती घेतात. यानंतर दहाव्या दिवशी भगवान मुख्य मंदिरात परततात. याला बहुडा यात्रा म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...