आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुत्रदा एकादशी आज:या व्रतामध्ये भगवान श्रीविष्णूंसह श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची करावी पूजा, प्राप्त होते अपत्य सुख

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी 2 जानेवारी, सोमवारी आहे. धार्मिक मान्यतेनुसार याला पौष पुत्रदा एकादशी म्हणतात. या दिवशी व्रत आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने कळत-नकळत केलेली पापे नष्ट होतात. या व्रतामुळे मिळणारे पुण्य कधीच संपत नाही.

मुलांच्या सुखासाठी हे व्रत केले जाते
असे मानले जाते की, या दिवशी व्रत करून श्रीविष्णूची आराधना केल्याने नि:संतान जोडप्यांना संतती प्राप्त होते. केवळ निपुत्रिकच नाही तर हे व्रत केल्याने अपत्य असलेल्या साधकांच्या अपत्याला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागत नाही. घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही आणि सदैव सुख-शांती नांदते.

पूजन विधी
या पूजेमध्ये श्रीविष्णूसोबत भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाचीही पूजा करावी, जेणेकरून कृष्णासारखे सुयोग्य अपत्य प्राप्ती होईल. सकाळी स्नान आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. व्रत करण्याचा संकल्प घेऊन पूजा करावी. देवाला पूजेत पिवळी फळे, पिवळी फुले, पंचामृत, तुळशी इत्यादी अर्पण करा. पती-पत्नीने एकत्र व्रताचा संकल्प घ्यावा आणि पूजा केल्यानंतर देवाची आरती करावी व सर्वांना प्रसाद वाटावा.

एकादशीची कथा
पौराणिक कथेनुसार भद्रावती नगरीत सुकेतू मान नावाचा राजा होता. त्याला मूलबाळ नव्हते, या चिंतेत तो खूप दुःखी असायचा. एकदा तो त्याच्या समस्येवर उपाय शोधत जंगलाकडे एकटाच निघाला. भटकत फिरत दुःखी राजा विश्वदेव ऋषींच्या सहवासात पोहोचला. तिथे त्याला या पुत्रदा एकादशीचे महत्त्व कळले. हे जाणून त्यांनी हे व्रत केले आणि हे व्रत केल्यामुळे त्यांना योग्य संतती प्राप्त झाली.

बातम्या आणखी आहेत...