आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुढच्या आठवड्यात गुरुवार, 11 ऑगस्ट रोजी, श्रावण महिन्यातील पौर्णिमा आणि रक्षाबंधन आहे. यंदा रक्षाबंधनच्या दिवशी दिवसभर भद्रा नक्षत्र असणार आहे. ज्योतिषी भद्राच्या काळात रक्षासूत्र न बांधण्याचा सल्ला देतात.
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्या मते, जर रक्षाबंधनाला भद्रा असेल तर ती वेळ रक्षासूत्र बांधण्यासाठी योग्य नाही. या वेळी श्रावण पौर्णिमा 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.38 वाजता सुरू होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 ऑगस्टला सकाळी 7.16 पर्यंत पौर्णिमा राहील. पंचांगाच्या फरकामुळे 12 ऑगस्ट रोजी अनेक भागात रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे.
सूर्योदयापासून पौर्णिमा तिथी तीन मुहूर्तांपेक्षाही कमी काळ राहील. त्यामुळे 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा करणे अधिक शुभ राहील. 11 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस भाद्रा असणार आहे. रात्री 8.30 वाजता भद्रा संपेल. त्यानंतरच रक्षासूत्र बांधावे. या दिवशी सकाळी 8.30 ते रात्री 9.55 या वेळेत चार चौघडिया मुहूर्त राहतील. यावेळी रक्षासूत्र बांधणे अधिक शुभ राहील.
रक्षाबंधनाला अशाप्रकारे बनवावे वैदिक रक्षासूत्र
श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला सकाळी स्नान करून देवतांची पूजा करावी. पितरांसाठी तर्पण करावे. या दिवशी रात्री 8.30 नंतर सुती किंवा रेशमी पिवले वस्त्र मोहरी, केशर, चंदन , तांदूळ दुर्वा आणि नाणे ठेवून बांधून घ्यावे. घरातील मंदिरात कलशाची स्थापना करून त्यावर वैदिक रक्षासूत्र ठेवावे. विधिव्रत पूजा करावी. पूजेनंतर, वैदिक रक्षासूत्र आपल्या उजव्या हातावर बहिणीकडून किंवा ब्राह्मणाकडून बांधून घ्यावे. असे मानले जाते की, हे संरक्षण सूत्र एक वर्षासाठी आपले संरक्षण करते.
रक्षाबंधनाच्या दिवशी अशी राहील ग्रहांची स्थिती
रक्षाबंधनाच्या दिवशी बृहस्पति मीन राशीत वक्री राहील . चंद्र शनिसोबत मकर राशीत राहील. या ग्रहांच्या संयोगाने विष योग निर्माण होतो. गुरूची नजर सूर्यावर, सूर्य शनिदेवावर आणि शनीची नजर गुरूवर असेल. या ग्रहयोगांमध्ये आपण अधिक काळजी घेतली पाहिजे. लहानशा निष्काळजीपणामुळेही नुकसान होऊ शकते.
श्रावण पौर्णिमेला करू शकता हे शुभ काम
पौर्णिमेच्या दिवशी नवीन कपडे, जोडे, छत्र्या गरजू लोकांना दान कराव्यात. मंदिरात पूजेचे साहित्य अर्पण करावे. गोशाळेतील गायींच्या संगोपनासाठी दान करा. सकाळी सर्वप्रथम श्रीगणेशाची पूजा करा. हनुमानासमोर धूप-दीप लावा, हनुमान चालीसा, सुंदरकांड किंवा हनुमान मंत्रांचा जप करावा. महादेवाला जल व दुधाने अभिषेक करावा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.