आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा- प्रत्येक आत्म्याने रक्षण करण्यासाठी स्वतःला पुरेसे सक्षम केले पाहिजे. हा स्वत:पासून स्वत:चाच बचाव आहे.
- रक्षाबंधनाच्या सणानिमित्त आपण एकमेकांना देऊ शकू अशी सर्वोत्तम भेट म्हणजे चांगल्या भावनांचा आशीर्वाद. ही त्या दोऱ्याची नव्हे, त्याच्या प्रेमाची, शुद्धतेची आणि संरक्षणाची बाब आहे.
- भाऊ-बहीण यांचे पवित्र नाते आहे. कुणी एकमेकांबद्दल चुकीचे विचार करत नाही. माझा आत्मा दुसऱ्या बद्दल चुकीचा विचार करत नाही.
उत्सव साजरा करण्यासाठी मन स्वच्छ असणे फार महत्त्वाचे आहे. आपण नातेसंबंधात दु:खी असतो तेव्हा प्रेम आणि आपुलकीची ऊर्जा वाहत नाही. आपण भेटू शकतो, सेलिब्रेशन करू शकतो, स्मित करू शकतो आणि गोड बोलू शकतो, परंतु आपण एकमेकांना कोणती ऊर्जा दिली? रक्षाबंधन सण भाऊ-बहिणीच्या मधुर संबंधांचे प्रतीक आहे. जितका महत्त्वाचा तितकाच नाजूक धाग्यांनी बांधलेला. जसजसे आपण मोठे होत गेलो तसतशी आपली मूल्ये बदलत गेली. बहीण म्हणते, माझा भाऊ बदलला आहे. आता त्या भावाने लग्न केले, त्याच्या कार्मिक खात्यात नवीन आलेल्या पत्नी वा मुले यांच्या संस्कारात थोडा बदल झाला. ते १० किंवा २० व्या वर्षी होते तसे आता राहणार नाहीत. आज ते ४० वर्षांचे असतील तर त्यांची मूल्ये बदलली आहेत. आम्ही अगदी सहजपणे म्हणतो की माझा भाऊ किंवा माझी बहीण बदलली आहे. भाऊ आणि बहिणीचे पवित्र नाते असते. म्हणजे एकमेकांबद्दल त्यांचे विचार चुकीचे नसतात. पवित्र नाते म्हणजे माझा आत्मा दुसऱ्याबद्दल चुकीचा विचार करत नाही.
रक्षाबंधनाच्या सणानिमित्त आपण एकमेकांना देणारी सर्वोत्तम भेट म्हणजे चांगल्या भावनांचा आशीर्वाद. ही त्या धाग्याची नव्हे, तर त्याच्या प्रेमाची, शुद्धतेची आणि संरक्षणाची बाब आहे. सध्याच्या काळात कोणापासून संरक्षण करावे आणि रक्षाबंधन काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आज आपण पाहतो की नात्यांचा अर्थ बदलला आहे. आधी प्रत्येक घरात पूजा-हवन होत असे, त्यानंतर गुरुजी दोरा बांधायचे. बऱ्याच वेळा आपण ही दोरा दीर्घ काळ मनगटावर ठेवत असू. पूजा करताना आपण देवी-देवतांना आवाहन करतो, आपल्यात देवत्व जागृत करतो. जेव्हा गुरुजी म्हणतात की, देवी-देवता तुमचे रक्षण करील तेव्हा स्वत:तील देवत्व आपले रक्षण करील. गुरुजी दोरा बांधतात याचा अर्थ असा की, मी आज ही प्रतिज्ञा केली. दोऱ्यात शक्ती आहे. दोरा बांधल्याने मी या प्रतिज्ञेने बद्ध आहे, हे आपल्या लक्षात राहील. लक्ष्मणाने रामायणात एक रेषा ओढली होती. ती रक्षण करणारी रेषा नव्हती, पण मर्यादेची रेषा ओलांडताच रावणाने पकडले. म्हणजे मी माझी मर्यादा ओलांडताच माझ्या आतील रावणाने, माझ्यातील नकारात्मकतेने माझ्यावर विजय मिळवला. आपण प्रतिज्ञा करतो तेव्हा स्वतःचा बचावही त्यात असतो, हे समजून घेतले पाहिजे. जेव्हा बहीण आपल्या भावाला राखी बांधते तेव्हा ती त्याला संरक्षणाच्या बंधनात बांधते.
आजच्या काळात महिला सबलीकरणाची चर्चा आहे. खरे तर, सशक्तीकरण केवळ स्त्रियांसाठी नसावे, तर प्रत्येक आत्म्याने स्वत:ला सक्षम केले पाहिजे, जेणेकरून तो स्वतःचे संरक्षण करू शकेल. हा स्वत:चा बचाव आहे. मन आपला आणि शत्रूही असतो, असे म्हणतात. मन आपला शत्रू आहे, म्हणजे आपले नकारात्मक विचार. उदा. वाईट वाटण्याची सवय. कोणी थोडे काही बोलले की डोळ्यात अश्रू येतात. मग शत्रू कोण आहे? जेव्हा देव पृथ्वीवर अवतार घेतात तेव्हा आपल्याला ज्ञान देतात, प्रेम देतात, शक्ती देतात; परंतु केवळ देण्याने ते आपल्यामध्ये येत नाहीत. म्हणून माझ्या आत्म्याला प्रतिज्ञा करावी लागेल. मग आपण आपला बचाव होताना पाहू शकू. आपल्याला तो दोरा बांधणे ही देवाची भूमिका आहे. मग त्याच्या प्रतिज्ञेत बांधून घेणे ही आपली भूमिका आहे. आपण स्वतःचे संरक्षण करू. ज्ञानाचा वापर केल्याने माझे रक्षण झाले, परंतु जोपर्यंत मी ते वापरत नाही, तोपर्यंत माझे रक्षण होणार नाही. आपण जितके मर्यादेत राहू, तितकी आत्म्याची शक्ती वाढेल. बरेच लोक भेटतात, ज्यांना वाटते की आज त्यांचे नाते पूर्वीपेक्षा चांगले झाले. आम्ही आत्महत्येपर्यंत पोहोचलो होतो, पण वाचलो, असे म्हणणारे भाऊ-बहीणही भेटतात. ते कोणापासून वाचले? आपण आपल्या नकारात्मक विचारांपासून वाचलो. म्हणजे प्रत्येक आत्म्याचे रक्षण त्याच्या मर्यादेमध्ये आहे. शुद्धतेचा तो धागा आज पुन्हा बांधण्याची गरज आहे.
शिवानी दीदी
ब्रह्मकुमारी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.