आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

उत्सव:3 ऑगस्टला श्रावण सोमवार आणि सर्वार्थ सिद्धी योगामध्ये साजरी होणार राखीपौर्णिमा, सकाळी 9.29 पर्यंत राहील भद्रा, शनिदेवाची बहीण आहे भद्रा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पौर्णिमेला भगवान सत्यनारायणाची पूजा करण्याची आणि कथा ऐकण्याची प्रथा

सोमवार 3 ऑगस्टला श्रावण मासातील पौर्णिमा तिथी आहे. या तिथीला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. यावेळी राखीपौर्णिमेला सर्वार्थ सिद्धी योगही राहील. मान्यतेनुसार, या योगामध्ये करण्यात आलेले शुभ काम लवकर सिद्ध होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सकाळी 9.29 पर्यंत भद्रा राहतील. त्यानंतर रक्षासूत्र बांधावे.

भद्राशी संबंधित मान्यता
पं. शर्मा यांच्यानुसार भद्रा काळाशी संबंधित विविध मान्यता प्रचलित आहेत. काही विद्वानांनुसार भद्रा शनिदेवाची बहीण आहे. भद्राचा स्वभाव शनिदेवाप्रमाणेच क्रूर आहे. ज्योतिषमध्ये याला एक विशेष काळ मानले जाते. या काळात कोणतेही शुभ काम सुरु केले जात नाही. शुभ काम उदा. लग्न, मुंज, नवीन घरात प्रवेश, रक्षाबंधनला रक्षासूत्र बांधणे इ. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास भद्रा म्हणजे अशुभ काळ.

पौर्णिमेला भगवान सत्यनारायण पूजा करण्याची प्रथा
प्रत्येक मासातील पौर्णिमेला भगवान सत्यनारायणाची पूजा करण्याची आणि कथा ऐकण्याची प्रथा चालत आली आहे. सत्यनारायण श्रीविष्णूंचेच एक स्वरूप आहे. यांच्या कथेमध्ये सत्य बोलण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. खोटं बोलणाऱ्या लोकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. असे कथेमध्ये सांगण्यात आले आहे.

शिवलिंगावर जल अर्पण करून करावा मंत्र जप
सोमवार हा महादेवाच्या पूजेचा विशेष दिवस असून श्रावण सोमवारचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करून अभिषेक करावा. बेलाचे पान अर्पण करावे. शिव मंत्र 'ॐ नमः शिवाय' चा कमीत कमी 108 वेळेस जप करावा. जप करण्याची रुद्राक्षाची माळ वापरावी.