आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दुर्लभ योग:राखीपौर्णिमा 3 ऑगस्टला, 558 वर्षांनंतर श्रावण मासातील पौर्णिमेला गुरु आणि शनि स्वराशीत राहतील वक्री

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व 12 राशींवर असा राहील ग्रहांचा प्रभाव

सोमवार, 3 ऑगस्टला श्रावण मासातील पौर्णिमा तिथी आहे. याच तिथीला राखीपौर्णिमा सण साजरा केला जातो. यावेळी सकाळी 9.29 पर्यंत भद्रा राहील. त्यानंतर दिवसभर केव्हाही बहीण भावांना राखी बांधू शकते. 3 तारखेला सकाळी 7.30 नंतर दिवसभर श्रवण नक्षत्र राहील. पौर्णिमेला पूजा झाल्यानंतर आपल्या गुरूंचाही आशीर्वाद अवश्य घ्यावा.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार राखीपौर्णिमेला गुरु स्वराशी धनूमध्ये आणि शनि मकर राशीत वक्री राहील. यादिवशी चंद्रही शनिसोबत मकर राशीमध्ये राहील. असा योग 558 वर्षांपूर्वी 1462 मध्ये जुळून आला होता. त्यावर्षी 22 जुलैला राखीपौर्णिमा सण साजरा करण्यात आला होता. यावर्षी राखीपौर्णिमेला राहू मिथुन राशीमध्ये, केतू धनु राशीमध्ये आहे. 1462 मध्येही राहू-केतूची हीच स्थिती होती.

सर्व 12 राशींवर राहील ग्रहांचा प्रभाव
मेष, वृषभ, कन्या, वृश्चिक, धनु, मकर, मीन राशीच्या लोकांसाठी ग्रहांचा हा योग शुभ राहील. या लोकांना कष्टाचे फळ मिळू शकते. आरोग्य लाभही होईल. नोकरीत यश प्राप्तीचे योग आहेत. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील. मिथुन,सिंह, तूळ, कुंभ राशीच्या लोकांसाठी सांभाळून राहावे. या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.