आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकर संक्रांतीनंतरचा दुसरा सूर्योत्सव:दीर्घायुष्य आणि रोगांपासून दूर राहण्यासाठी रथसप्तमीला केली जाते सूर्यपूजा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकर संक्रांतीनंतर दुसरा सूर्योत्सव माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो. याला रथसप्तमी किंवा आरोग्य सप्तमी म्हणतात. हे पर्व यावेळी 7 फेब्रुवारीला आहे. अनेक पुराणात या सणाचे विशेष वर्णन केले आहे. मकर संक्रांतीप्रमाणे या दिवशीही सूर्योदयापूर्वी तीर्थस्नान केले जाते. त्यानंतर उगवत्या सूर्याला जल अर्पण करून पूजा केली जाते. यानंतर ब्राह्मण आणि गरजूंना दान दिले जाते. या दिवशी व्रत करून तीळ खाल्ल्याने काळात-नकळतपणे झालेली सर्व प्रकारची पापे नष्ट होतात, असे ग्रंथांमध्ये सांगितले आहे.

या तिथीला भगवान सूर्यदेवाला मिळाला होता रथ
पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र यांच्यानुसार मत्स्य पुराणात असे सांगितले आहे की, मन्वंतराच्या प्रारंभी या तिथीला सूर्यदेवाला रथ प्राप्त झाला होता. त्यामुळे या दिवशी सूर्य आणि त्याच्या रथाची पूजा केली जाते. असे केल्याने महापूजेसारखेच फळ मिळते असे ग्रंथामध्ये सांगण्यात आले आहे. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला कंबोजचा राजा यशोधर्माविषयी सांगितले की, माघ महिन्याच्या सप्तमीच्या व्रताने त्या राजाचे अनेक रोग नाहीसे झाले होते आणि म्हातारपणातही अपत्य प्राप्ती झाली होती. यामुळे तो चक्रवर्तीचा राजाही झाला होता.

सात पुराणांमध्ये रथ सप्तमीचे महत्त्व
ब्रह्मा, स्कंद, शिव, अग्नी, मत्स्य, नारद आणि भविष्य पुराणात या दिवसाचे विशेष वर्णन करण्यात आले आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला तीर्थ-स्नान आणि सूर्यपूजा केल्याने रोग दूर होतात तसेच वय वाढते, असे या पुराणांमध्ये सांगितले आहे. या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य कधीच संपत नाही आणि अनेक शुभ फळही प्राप्त होतात. तसेच या दिवशी उपवास केल्याने मुलांना सुख प्राप्ती होते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात.

लाल फुल अर्पण करावे व धूप लावून पूजा करावी
स्नान केल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते. सूर्यदेवाला कलशातून जल अर्पण करून अर्घ्यदानाचा विधी केला जातो. या विधी दरम्यान, भक्तांनी नमस्कार मुद्रेत असावे आणि सूर्यदेवाच्या दिशेकडे तोंड करावे. यानंतर तुपाचा दिवा आणि लाल फुले, कापूर, धूपने सूर्यदेवाची पूजा करावी. अशाप्रकारे पूजा केल्यास सूर्यदेव चांगले आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश प्रदान करतात.

बातम्या आणखी आहेत...