आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगन्नाथ पुरी:केंद्र सरकारने रथयात्रेसाठी रथ बनवण्याची परवानगी दिली, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांप्रमाणे काम होणार 

पुरीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदिर 20 मार्चपासून बंद

भगवान जगन्नाथांची ओडिशातील पुरी येथून रथयात्रा काढण्यासाठी केंद्र सरकारने रथ निर्माणाची परवानगी दिली आहे. परंतु मंदिर समितीला यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टेंसिंगच्या सर्व अटींचे पालन करावे लागेल. रथयात्रा 23 जूनला निघणार आहे. केंद्र सरकारच्या या परवानगीनंतर रथयात्रे संदर्भात चालू असलेल्या चर्चांवर आता काहीसा पूर्णविराम लागला आहे. मात्र रथयात्रा निघाली तर त्याचे स्वरूप कसे असेल यावर अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

केंद्र सरकारने रथ निर्माण दरम्यान सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे असे स्पष्ट केले आहे. रथाचे निर्माणही सामान्य लोक एकत्र येणार नाहीत अशा ठिकाणी करण्यास सांगितले आहे. आतापर्यंत रथ मंदिरासमोरच तयार करण्यात येत होता, जो रथयात्रेचा मुख्य मार्ग आहे. येथे लोकांची गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे रथ वेगळ्या ठिकाणी तयार करावा असे सांगण्यात आले आहे.

मंदिर 20 मार्चपासून बंद

रथयात्रा होणार की नाही याविषयी मागील काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरु होत्या. कोरोना व्हायरसच्या संकटात मंदिर 20 मार्चपासूनच भक्तांसाठी बंद आले. रथयात्रा जगन्नाथ मंदिराचा सर्वात मोठा उत्सव आहे. देश-विदेशातून 10 लाखांपेक्षा जास्त लोक यामध्ये सहभागी होतात. लॉकडाऊननंतर कोरोनामुळे रथयात्रा यावर्षी शक्यतो होणार नाही असा अंदाज बांधला जात होता. 26 एप्रिलला अक्षय्य तृतीयेपासून मंदिरात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचा रथ तयार होणार होता परंतु लॉकडाऊनमुळे हे काम सुरु झाले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...