आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रथयात्रा:भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांचे रथ गुंडिचा मंदिरात पोहचले, 7 दिवसांचा उत्सव रद्द, 1 जुलैला जगन्नाथ मंदिर परत जातील भगवान

पुरी10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगातील सर्वात मोठ्या स्वयंपाकघराची प्रतिकृती गुंडीचा मंदिरात

रथयात्रेचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ गुंडिचा मंदिरात पोहचले आहेत. मंदिराबाहेर बॅरिकेडिंगमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. यानंतर पुढील 7 दिवस भगवान इथेच राहतील. यावर्षी रथ उत्सव साजरा केला जाणार नाही. 1 जुलैला भगवान जगन्नाथ परत याच रथांवर बसून मुख्य मंदिरात जाणार आहेत. याला बहुडा यात्रा म्हटले जाते.

दरम्या, जगन्नाथ पुरी येथे दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी भगवान जगन्नाथांचा नंदीघोष रथ ओढण्यात आला. त्यापूर्वी  12 वाजून 10 मिनिटांनी पहिला रथ ओढला गेला. भगवान जगन्नाथांचे भाऊ बलभद्र यांचा काळे घोडे जुंपलेला तळध्वज रथ मंदिराच्या सेवकांनी ओढण्यास सुरुवात केली. त्यानंतर 12 वाजून 50 मिनिटांनी सुभद्रा देवीचा पदमध्वज रथ ओढण्यात आला.

तत्पूर्वी सकाळी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा देवी यांना मंदिरातून रथामध्ये विराजित करण्यात आले आहे. पुरी शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती आणि गजपती महाराज दिव्यसिंह देव हेसुद्धा पूजा करण्यासाठी पोहोचले. पूजा झाल्यानंतर पुरीच्या गजपती महाराजांनी सोन्याच्या झाडूने भगवान जगन्नाथाचा रथ स्वच्छ केला. मंदिरातील सर्व सेवकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये एक सेवक कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्याला रथयात्रेपासून दूर ठेवण्यात आले आहे. रथयात्रा सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसारच काढण्यात येत आहे.

2500 वर्षांपेक्षा जास्त जुना असलेल्या रथयात्रेच्या इतिहासात प्रथमच असे घडत आहे की, भगवान जगन्नाथ रथयात्रा निघेल परंतु भक्त घरात कैद राहतील. कोरोना महामारीमुळे संपूर्ण पुरी शहर लॉकडाऊन करून मंदिराचे 1172 सेवक रथयात्रा गुंडीचा मंदिरापर्यंत घेऊन जातील. 

2.5 किमीच्या या यात्रेसाठी मंदिर समितीला दिल्लीपर्यंतचा प्रवास पूर्ण करावा लागला. सुप्रीम कोर्टाच्या बंदीनंतर मंदिर समितीसोबत विविध संस्थांनी सरकारकडे रथयात्रेसाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली. सुप्रीम कोर्टात 6 याचिका दाखल करण्यात आल्या. शेवटी निर्णय मंदिर समितीच्या बाजूने लागला आणि पुरी शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कोर्टाचा निर्णय येताच सेवकांनी रथशाळेत उभा असलेला रथ खेचून मंदिरासमोर आणून उभा केला.

मंगळवारी रथयात्रा पूर्ण करून भगवान जगन्नाथ भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रासोबत मुख्य मंदिरापासून दूर अडीच किलोमीटर आपल्या मावशीच्या घरी गुंडीचा मंदिरात जातील. येथे सात दिवस थांबून आठव्या दिवशी पूर्ण मुख्य मंदिरात पोहोचतील. इतिहासात पहिल्यांदा भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा संचारबंदीत निघेल. यात्रेत सहसा सुमारे 20 लाख लोक सामील होतात, मात्र या वेळी ही संख्या दोन हजारांपर्यंत राहील.

जगातील सर्वात मोठ्या स्वयंपाकघराची प्रतिकृती गुंडीचा मंदिरात

भगवान जगन्नाथांसाठी जगन्नाथ मंदिरात 752 चुलींवर नैवद्य तयार होतो. हे जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर मानले जाते. रथयात्रेदरम्यान येथील चुली थंड होतात. गुंडीचा मंदिरातही 752 चुलींचे स्वयंपाकघर आहे. याला भगवान जगन्नाथ यांच्या स्वयंपाकघराची प्रतिकृती मानले जाते. या उत्सवादरम्यान येथेच देवासाठी नैवेद्य बनवला जातो.

16 चाके असलेला 13 मीटर उंच भगवान जगन्नथांचा रथ, याची 3 नावे

भगवान जगन्नाथ यांचा रथ - नंदीघोष, गरुडध्वज, कपिध्वज : चाके- 16, लाकडाचे तुकडे- 832 नग, उंची- 13.5 मीटर, लांबी व रुंदी- 34 फूट 6 इंच बाय 34 फूट 6 इंच, आच्छादन कापडी - लाल व पिवळा, संरक्षण- गरुड, रथाचे नाव- दरुका, ध्वजाचे नाव- त्रिलोक्य मोहिनी, दोराचे नाव- शंखचूड, 

बलभद्रांचा रथ- तळध्वज : रथाला चाके- 14, लाकडाचे तुकडे 763 नग, रथाची उंची 13.2 मीटर, लांबी व रुंदी- 33 फूट बाय 33 फूट, कापडी आच्छादन- लाल, निळसर हिरवा, संरक्षण- वासुदेव, चालकाचे नाव- आताली, ध्वज- उन्नानी, दोराचे नाव- बसुकी.

देवी सुभद्रा यांचा रथ - दर्पदालन/पद्मध्वज : रथाला चाके - 12, लाकडाचे तुकडे 593 नग, रथाची उंची- 12.9 मीटर, लांबी व रुंदी- 31 फूट 6 इंच बाय 31 फूट 6 इंच, कापडी आच्छादन- लाल व काळा, संरक्षण- जयदुर्ग, सारथी- अर्जुन, ध्वज- नंदबिका, दोराचे नाव- स्वयंमुद्रा.

5000 वर्षांपूर्वी सुरु झाली होती जगन्नाथ यात्रा, जाणून घ्या यामागची कथा

या रथयात्रेशी निगडीत काही आख्यायिकाही प्रचलित आहेत. पुरी येथील विद्वान आणि पंडितांनुसार देवी सुभद्रा यांच्या द्वारका दर्शनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्ण आणि बलराम यांनी वेगवेगळ्या रथांमध्ये बसून यात्रा केली होती. सुभद्रा यांच्या नगर यात्रा स्मृतीमध्ये ही रथयात्रा दरवर्षी पुरी येथे निघते. या व्यतिरिक्त भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्याची परंपरा राजा इंद्रद्युमने सुरु केली होती.

जवळपास 5000 वर्षांपूर्वी म्हणजे कलियुगाच्या प्रारंभी मालव देशावर राजा इंद्रद्युम राज्य करीत होता. हा राजा भगवान जगन्नाथाचा भक्त होता. एके दिवशी राजा इंद्रद्युम भगवंताचे दर्शन करण्यासाठी नीलांचल पर्वतावर पोहोचला. तिथे भगवंताची प्रतिमा दिसली नाही. निराश होऊन राजा परत फिरला तेव्हा आकाशवाणी झाली. लवकरच भगवान जगन्नाथ मूर्तीच्या स्वरूपात पुन्हा धरतीवर अवतरित होणार आहेत. आकाशवाणी ऐकून राजाला आनंद झाला.

एकदा राजा इंद्रद्युम पुरीच्या समुद्रतटावर सहज फिरत होते. समुद्रात दोन लाकडाचे ओंडके त्याला तरंगताना दिसले. त्याच वेळी राजाला आकाशवाणी आठवली. राजाने विचार केला की आता या ओंडक्यांपासूनच मूर्ती बनवू. तेव्हा भगवंताच्या आज्ञेने देवांचे शिल्पकार विश्वकर्मा तिथे सुताराच्या रूपात प्रकट झाले. सुताराने राजाला म्हटले की, या ओंडक्यांपासून देवाची मूर्ती बनवता येईल. आधीच राजाच्या मनात असा विचार असल्यामुळे राजाने तात्काळ होकार दिला.

विश्वकर्माने एक अट टाकली की, ते मूर्तीनिर्माणाचे कार्य एकांतात करतील. त्यावेळी तिथे दुसरा कोणी आला तर काम सोडून निघून जातील. राजाने अट मान्य केली. मग गुंडीचा नामक स्थानी विश्वकर्मा मूर्ती बनवू लागले. काही दिवसानंतर राज अट विसरला आणि सुताराला भेटायला गेला. राजाला पाहून सुतार अर्थात विश्वकर्मा अंतर्धान पावले आणि भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती अर्धवटच राहिल्या. त्याच वेळी आकाशवाणी झाली. भगवंत याच रुपात स्थापित होऊ इच्छितात. मग राजाने भव्य मंदिराची निर्मिती करून तीन्ही मूर्तींची स्थापना केली.

भगवान जगन्नाथाने मंदिर निर्माणाच्या वेळी राजाला सांगितले होते की वर्षातून एकदा ते आपल्या जन्मभूमी अवश्य जातील. स्कंदपुराणातील उत्कल खंडानुसार इंद्रद्युम राजाने आषाढ शुक्ल द्वितियेच्या दिवशी प्रभूची जन्मभूमीला जाण्याची व्यवस्था केली. तेव्हापासून या दिवशी रथयात्रा काढण्याची परंपरा सुरू आहे ते आजतागायत.

बातम्या आणखी आहेत...