आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगन्नाथ रथयात्रा:रथांच्या निर्माणासाठी 150 विश्वकर्मा सेवक 15-16 तास रोज करणार काम, ना घरी जाणार, ना कोणालाही भेटणार

भोपाळएका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • 45 फूट उंच आणि 16 चाकांचा असतो भगवान जगन्नाथ यांचा रथ, तिन्ही रथांचे आहे खास वैशिष्ट्य

ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेची तयारी सुरु झाली आहे. शुक्रवारी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ तयार करण्याचे काम सुरु झाले. 12 दिवस उशिरा सुरु झालेल्या रथांचे काम पूर्ण करण्यासाठी 150 विश्विकार्मा सेवक दिवसातून 15 ते 16 तास काम करणार. रथ तयार करण्याच्या ठिकाणी सकाळी 8 पासून रात्री 10 वाजेपर्यंत काम सुरु राहील. या दरम्यान हे सेवक कोणालाही भेटणार नाहीत आणि घरीही जाणार नाहीत. या ठिकाणी बाहेरील लोकांना येण्यास परवानगी नाही.

मंदिर समिती आणि रथ निर्माणशी संबंधित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रथ तयार करण्यासाठी सर्व विश्वकर्मा सेवकांची कामे निश्चित आहेत आणि त्यांनी आपल्या जबाबदारीने काम करण्यास सुरुवात केली आहे. रथ निर्माण शास्त्रोक्त पद्धतीने केले जाते. रथ निर्माणाचा विधी विश्वकर्मीया रथ निर्माण पद्धती, गृह कर्णिका आणि शिल्प सार संग्रह यासारख्या ग्रंथामध्ये सांगण्यात आला आहे परंतु विश्वकर्मा सेवक आपल्या पारंपरिक ज्ञानाने रथ निर्माण करतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. श्री जगन्नाथ मंदिर समितीचे मुख्य प्रशासक डॉ. किशन कुमार यांच्यानुसार, सर्व विश्वकर्मा सेवकांसाठी मंदिर रेस्टहाऊसमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करत काम सुरु आहे.

45 फूट उंच आणि 16 चाकांचा असतो भगवान जगन्नाथ यांचा रथ, तिन्ही रथांचे आहे खास वैशिष्ट्य

रथयात्रेमध्ये बलराम यांच्या रथाला 'ताळध्वज' म्हणतात. देवी सुभद्रा यांचा रथाला ‘दर्पदलन’ तर भगवान जगन्नाथ यांचा रथाला 'नंदीघोष' किंवा 'गरुडध्वज' म्हणतात. हा रथ सर्वात मागे राहतो. या तिन्ही रथाची उंची, चाके आणि आकृती वेगवेगळी असते.

भगवान जगन्नाथ यांचा रथ - नंदीघोष, गरुडध्वज, कपिध्वज पताका चाके- 16, लाकडाचे तुकडे- 832 नग, उंची- 13.5 मीटर, लांबी व रुंदी- 34 फूट 6 इंच बाय 34 फूट 6 इंच, आच्छादन कापडी- लाल व पिवळा, संरक्षण- गरुड, रथाचे नाव- दरुका, ध्वजाचे नाव- त्रिलोक्य मोहिनी, दोराचे नाव- सारवुजडा

बलभद्रांचा रथ- तळध्वज रथाला चाके- 14, लाकडाचे तुकडे 763 नग, रथाची उंची 13.2 मीटर, लांबी व रुंदी- 33 फूट बाय 33 फूट, कापडी आच्छादन- लाल, निळसर हिरवा, संरक्षण- वासुदेव, चालकाचे नाव- आताली, ध्वज- उन्नानी, दोराचे नाव- बसुकी.

देवी सुभद्रा यांचा रथ - दर्पदालन/पद्मध्वज रथाला चाके - 12, लाकडाचे तुकडे 593 नग, रथाची उंची- 12.9 मीटर, लांबी व रुंदी- 31 फूट 6 इंच बाय 31 फूट 6 इंच, कापडी आच्छादन- लाल व काळा, संरक्षण- जयदुर्ग, सारथी- अर्जुन, ध्वज- नंदबिका, दोराचे नाव- स्वयंमुद्रा.

बातम्या आणखी आहेत...