आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2023 मधील पहिले मोठे मुहूर्त:8 जानेवारीला रविपुष्य योग, खरेदीसाठी संपूर्ण दिवस राहील शुभ

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षातील पहिले पुष्य नक्षत्र रविवार, 8 जानेवारी रोजी असेल. त्यामुळे रविपुष्य हा योग जुळून येत आहे. या दिवशी सर्वार्थसिद्धी योगही तयार होईल. त्यामुळे संपूर्ण दिवस खरेदीसाठी आणि नवीन सुरुवातीसाठी शुभ राहील. या योगाचे वर्णन ज्योतिषशास्त्रात सर्वोत्तम मुहूर्त म्हणून केले आहे. या संयोगात केलेल्या कामात यश जवळपास निश्चित असल्याचे ज्योतिषी सांगतात. म्हणूनच अशा योगात खरेदी, व्यवहार, गुंतवणूक याबरोबरच नवीन नोकरी आणि व्यवसाय सुरू करणे फायदेशीर मानले जाते.

या शुभ मुहूर्ताबद्दल पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र सांगतात की, पुष्य नक्षत्रासोबत रविवारी सर्वार्थसिद्धी, बुद्धादित्य आणि श्रीवत्स योग जुळून येत आहेत. चंद्रावर गुरूची दृष्टी पडत असल्याने गजकेसरी योगाचे फळ मिळेल. नक्षत्रांच्या या शुभ संयोगात केलेल्या कामात यश आणि लाभ मिळण्याची शक्यता अधिक वाढेल. या वर्षातील पहिला पुष्य संयोग 8 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे नक्षत्र सकाळी ७ वाजता सुरू होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत राहील. हा दिवस रविवार असल्याने तो रविपुष्य मानला जाईल.

काशी विद्वत परिषदेचे सरचिटणीस प्रा. रामनारायण द्विवेदी सांगतात की 2023 मध्ये रविपुष्य पाच वेळा आणि गुरु पुष्य दोनदा असेल. अशा रीतीने संपूर्ण वर्षात पुष्य नक्षत्रापासून एकूण 7 मोठे शुभ मुहूर्त तयार होतील.

सोने हा पुष्य नक्षत्राचा धातू
पुष्य नक्षत्रात केलेली खरेदी समृद्धी देणारी असते. या नक्षत्राचा धातू सोन्याचा आहे, त्यामुळे या योगात सोने आणि सोन्याचे दागिने खरेदी केल्याने समृद्धी येते. गुरु पुष्य नक्षत्रात रिअल इस्टेट तसेच जमीन, इमारत, वाहने आणि इतर स्थिर मालमत्तांमध्ये केलेली गुंतवणूक दीर्घकालीन लाभ देते. या दिवशी चांदी, कापड, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे देखील शुभ असते. या शुभ योगात खरेदी केलेले वाहन बरेच दिवस टिकते आणि त्याचा फायदा होतो. शुभ योगात नवीन व्यवसाय आणि नोकरी सुरू करणे देखील फलदायी मानले जाते.

नक्षत्रांचा राजा आहे पुष्य
पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हटले जाते. हे नक्षत्र आठवड्याच्या विविध वारांसोबत मिळून विशेष योग जुळवते. या सर्वाचे स्वतःचे एक विशेष स्थान आहे. रविवार, बुधवार आणि गुरुवारी येणारा पुष्य नक्षत्र खुप शुभ असतो. ऋग्वेदात याला मंगलकर्ता, वृध्दिकर्ता, आनंद कर्ता आणि शुभ म्हटले जाते.

बातम्या आणखी आहेत...