आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 डिसेंबरला सोमवार आणि एकादशीचा शुभ योग:श्रीविष्णूसह महादेव आणि चंद्रदेवाची करावी पूजा, सुख-समृद्धीसाठी केले जाते हे व्रत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 19 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे. याला सफला एकादशी म्हणतात. सोमवार आणि एकादशीच्या संयोगामुळे या दिवशी भगवान श्रीविष्णू तसेच महादेव आणि चंद्रदेवाची पूजा करणे शुभ राहील.

उज्जैनचे ज्योतिषी पं. मनीष शर्मा यांच्या मते, वर्षातील सर्व एकादशींचे व्रत केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहते आणि कामात यश मिळते. सफाला एकादशी सोमवारी आहे, हे व्रत कठीण कार्य यशस्वी करून देणारे आहे.

अशा प्रकारे सफाला एकादशीचे व्रत करू शकता
सोमवारी सकाळी लवकर उठून तळहाताकडे पाहून भगवान श्रीविष्णूचे ध्यान करावे. स्नानानंतर तांब्याच्या भांड्यातून सूर्याला जल अर्पण करताना ऊँ सूर्याय नमः मंत्राचा जप करावा.

सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर घरातील मंदिरात भगवान श्रीविष्णूसमोर व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प घ्यावा. श्रीगणेशाची पूजा केल्यानंतर श्रीविष्णूसह महालक्ष्मीची पूजा करावी. पूजेत दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक करावा. भगवान श्रीविष्णूच्या मूर्तीला रेशमी पिवळ्या रंगाचे आणि महालक्ष्मीच्या मूर्तीला रेशीम लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे. इतर पूजन सामग्री अर्पण करून पूजा करावी.

तुळशीचे पाने टाकून मिठाईचा नैवेद्य दाखवावा. धूप-दीप लावून आरती करावी. पूजा करताना ऊँ नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा.

श्रीविष्णू-लक्ष्मीची पूजा केल्याने घर-कुटुंबात सुख-समृद्धी कायम राहते. धन संबंधित कामामधील अडचणी दूर होतात. वैवाहिक जीवन सुखी राहते.

भगवान शंकराच्या उपासनेचा लाभ
जे शिवाची आराधना करतात त्यांचे लोभ, आसक्ती, अहंकार, अज्ञान, खोटे बोलणे, नशा यांसारखे दुष्कृत्य नाहीसे होतात. शिवाची उपासना केल्याने मन वाईट गोष्टींकडे भरकटत नाही. सोमवारी शिवलिंगाला जल अर्पण करून बिल्वपत्र अर्पण करावे. दीप प्रज्वलित करून ऊँ नमः शिवाय मंत्राचा जप करावा.

चंद्राची पूजा केल्याने मन होते शांत
चंद्रदेव हा मनाचा कारक मानला जातो. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राची स्थिती ठीक नाही, त्यांचे मन अशांत राहते. या लोकांनी प्रत्येक सोमवारी भगवान शंकराच्या मस्तकावर स्थित चंद्राची पूजा करावी. शिवलिंगावर चांदीच्या भांड्यातून दूध अर्पण करावे. असे केल्याने चंद्र ग्रहाचे दोष दूर होतात आणि मनाची चंचलता दूर होते.

बातम्या आणखी आहेत...