आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परंपरा:शास्त्रानुसार जमिनीवर बसून करावे जेवण, आयुर्वेदानुसार यामुळे लवकर पचते अन्न आणि शरीराला मिळते ताकद

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जमिनीवर बसून जेवण केल्याने होणारे काही खास फायदे....

शास्त्रामध्ये जेवण करताना पाय पसरवून, पालथी मांडी घालून किंवा पाय वर करून बसने निषिद्ध असल्याचे सांगितले आहे. कारण पाय ताणून बसल्याने पोटाच्या नसनाड्या व जठरावर ताण पडतो. पोटाचे अवयव ताणलेल्या स्थितीत असताना खाल्याने मंदाग्नी, अपचन, वातप्रकोप यासारखे अनेकानेक पोटाचे आजार होतात. सुखासनात बसून जेवल्याने तुम्ही या समस्यांपासून दूर राहू शकता.

जमिनीवर बसून जेवण केल्याने होणारे काही खास फायदे....
वजन नियंत्रणात राहते -

जेव्हा तुम्ही सुखासनात बसता, तेव्हा तुमचा मेंदू शांत होतो. तुमच्या व्यवस्थितपणे जेवणावर लक्ष केंद्रित करू शकता. डायनिंग टेबलवर जेवण न करता सुखासनात बसून केल्याने खाण्याची गती संथ होते. यामुळे पोट आणि मेंदूला योग्य वेळेवर तृप्तीची जाणीव होते. अशाप्रकारे सुखासनात बसून जेवण केल्याने तुम्ही गरजेपेक्षा जास्त जेवण करण्यापासून दूर राहू शकता. जमिनीवर बसून जेवन केल्यानंतर पोट सुटत नाही. शिवाय अपचन, जळजळ, पोटासंबधीत विकार होत नाहीत.

अन्न पचवणे सोपे -
सुखासनात बसून जेवण केल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही जमिनीवर बसून जेवण करता तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे खाण्यासाठी थोडेसे पुढे वाकता आणि अन्न गिळण्यासाठी पुन्हा पूर्वस्थितीमध्ये येतात. अशाप्रकारे वारंवार पुढे आणि मागे वाकल्यामुळे तुमच्या पोटातील मांसपेशी सक्रिय होतात. यामुळे तुमच्या पोटातील अॅसिडही वाढते. यामुळे तुम्हाला अन्न पचवणे सोपे जाते.

वेळेआधीच म्हातारपण येऊ देत नाही -
जेवण करण्याची ही पारंपारिक पद्धत तुम्हाला वृद्धावस्थेपासून दूर ठेवते, कारण सुखासनात बसून जेवण केल्याने मणका आणि पाठीच्या समस्या होत नाहीत. सुखासनात बसून जेवल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत.

कुटुंबाला एकत्रित ठेवते - सामान्यतः जमिनीवर बसून जेवण्याची प्रथा एक कौटुंबिक गतिविधि आहे. योग्य वेळेवर संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे जेवण करत असेल तर एकमेकांमधील सामंजस्य वाढते. तुमच्या कुटुंबाशी समरस होण्याचा हा अतिशय उत्तम पर्याय आहे, कारण जमिनीवर बसून जेवण केल्याने तुमचे मन शांत राहते. यामुळे हा उपाय तुमच्या कुटुंबाला एकत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

वय वाढू शकते - एका संशोधनानुसार जे लोक जमिनीवर पद्मासन किंवा सुखासनात बसतात आणि कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता उठून उभे राहण्यास सक्षम असतात, त्यांची दीर्घ काळ जगण्याची शक्यता जास्त असते. या मुद्रेतून उठण्यासाठी जास्त लवचिकपणा आणि शारीरिक शक्तीची आवश्यकता असते. या संशोधनातून हेही समोर आले आहे की, जे लोक कोणत्याही आधाराशिवाय उठून उभे राहण्यास सक्षम नसतात, त्यांची पुढील सहा वर्षात मृत्यूची शक्यता 6.5 पटीने जास्त होती.

डोकं शांत राहते - जे लोक सुखासनात बसून जेवण करतात, त्यांचा मेंदू तणाव रहित राहण्याची शक्यता जास्त असते, कारण यामुळे मेंदू रीलॅक्स आणि तंत्रीका शांत होतात.जमिनीवर बसून जेवन केल्यांनतर एकाग्रता वाढते. आयुर्वेदानुसार मन शांत ठेवून जेवण केल्यास अन्न व्यवस्थित पचते तसेच जेवल्यानंतर संतुष्टतेची जाणीव होते.

- सुखासनात बसल्याने जठराग्नी प्रदीप्त होतो, त्यामुळे अन्नपचनात मदत मिळते. प्राणवायुला गती मिळते. यकृत व आमाशय दोघांचे कार्य सुलभरीत्या होते.

- टेबल-खुर्चीवर बसून जेवल्याने शारीरिक उष्णता योग्यप्रकारे निर्माण होत नाही, त्यामुळे अन्नपचनात मदत मिळत नाही. यकृत व आमाशय व मलाशयाला हानी पोहोचते. पोटाचे विकार उद्भवतात, मूत्ररोग वाढतो.

बातम्या आणखी आहेत...