आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकष्ट चतुर्थी:आज वैशाख महिन्यातील संकष्ट चतुर्थी, पौराणिक कथेनुसार हे व्रत सत्ययुगापासून सुरु

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. ही तिथी शुभ मानली जाते. या दिवशी एकदंत श्रीगणेशाची पूजा करण्याचा नियम आहे. या तिथीला सकाळी आणि संध्याकाळी श्रीगणेशाची पूजा करावी आणि शुद्ध तुपापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. ब्राह्मण जेवण झाल्यावर मग स्वतः जेवावे. या संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.

भविष्य पुराणानुसार संकष्ट चतुर्थीला पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला चंद्राला अर्घ्य अर्पण केल्याने सौभाग्य आणि वैवाहिक सुख प्राप्त होते. यासोबतच शारीरिक समस्याही दूर होतात.

हे संकष्ट व्रत मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्त होण्यासाठी पाळले जाते. वैशाख महिन्यातील या चतुर्थीला उपवास आणि पूजा केल्याने सुख-समृद्धी वाढते.

कथा: सत्ययुगात ब्राह्मणाच्या सुनेने संकष्ट व्रत पाळले होते
राजा पृथुने सत्ययुगात शंभर यज्ञ केले होते. त्याच्या राज्यात दयादेव नावाचा एक ब्राह्मण होता. ज्याला वेदांचे ज्ञान होते. त्याला चार अपत्य होते. वडिलांनी मुलांचे लग्न लावून दिले. त्या चार सूनांपैकी मोठी सून एके दिवशी आपल्या सासूला म्हणाली की, मी लहानपणापासून संकटांचा नाश करणाऱ्या गणेश चतुर्थीचे व्रत करते. म्हणूनच तुम्ही मला हे व्रत येथेही करण्याची परवानगी द्यावी.

सुनेचे म्हणणे ऐकून सासरे म्हणाले की तू मोठी आहेस. तुला काही अडचण नाही. कशाचीही कमतरता नाही. मग उपवास का करायचा? हा तुझा काळ उपभोग घेण्याचा आहे. काही काळानंतर ती गरोदर राहिली. तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्यानंतरही सासूने उपवास करण्यास नकार दिला.

मुलगा मोठा झाल्यावर लग्नाच्या वेळी त्याचे मन भरकटले आणि तो कुठेतरी निघून गेला. या अप्रिय घटनेमुळे सर्वजण अस्वस्थ झाले आणि म्हणू लागले - मुलगा कुठे गेला? कोणी अपहरण केले? अशी बातमी वऱ्हाडी मंडीळीकडून मिळताच मुलाच्या आईने सासरे दयादेव यांना म्हटले- तुम्ही मला माझे गणेश चतुर्थीचे व्रत तोडायला लावले, त्यामुळे माझा मुलगा बेपत्ता झाला.

यामुळे सासरे खूप दुःखी झाले. यानंतर सुनेने संकट नाशक गणेश चतुर्थीचे व्रत करण्याचा संकल्प केला आणि तो मुलगा परत आला. यानंतर सून नेहमी हे व्रत करू लागली. व्रताच्या प्रभावाने त्यांचा त्रास संपला.