आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकष्ट चतुर्थी 9 एप्रिल रोजी:संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या चतुर्थीला श्रीगणेशाच्या विकट रूपाची करावी पूजा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी 9 एप्रिल, रविवारी आहे. या दिवशी चैत्र संकष्ट गणेश चतुर्थी व्रत केले जाईल. या व्रतामध्ये श्रीगणेशाच्या विकट स्वरूपाची पूजा करण्याचे विधान आहे. म्हणून याला विकट संकष्ट चतुर्थी असेही म्हणतात.

भविष्य पुराणात असेही सांगण्यात आले आहे की संकष्ट गणेश चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होते आणि धर्म, अर्थ, मोक्ष, ज्ञान, धन आणि आरोग्य मिळते.

श्रीगणेश पूजन विधी
सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. पूजेच्या ठिकाणी श्रीगणेश,महादेव आणि देवी पार्वतीची स्थापना करावी. दिवसभर उपवास ठेवण्याचा संकल्प घ्यावा आणि पूजा सुरू करावी. जल, पंचामृत, चंदन, अक्षत, फुले, दुर्वा आदी पूजन सामग्रीने पूजा करावी.

सूर्यास्तापूर्वी पुन्हा पूजा करावी. रात्री चंद्र पाहून अर्घ्य अर्पण करावे आणि चंद्राची पूजाही करावी. फळे आणि मिठाईचा नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद वाटावा.

मोराची स्वारी असलेले विकट रूप
जालंधर नावाच्या राक्षसाचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने त्याची पत्नी वृंदा हिचे पावित्र्य भंग केले. त्याच्यापासून राक्षसाचा जन्म झाला, त्याचे नाव कामासुर होते. महादेवाची उपासना करून कामासूरला त्रिलोक विजयाचे वरदान मिळाले. यानंतर तो इतर राक्षसांप्रमाणे देवतांचा छळ करू लागला.

देवतांनी श्रीगणेशाचे ध्यान केले. त्यानंतर गणपतीने विकट रूप अवतार घेतला. या रूपात भगवान मोरावर बसलेले प्रकट झाले. देवांना निर्भयतेचे वरदान देऊन कामसूरचा पराभव केला.

सौभाग्य आणि समृद्धी देणारे व्रत
भविष्य पुराणानुसार संकष्ट चतुर्थीला पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होतात. चैत्र महिन्यातील कृष्ण चतुर्थीला चंद्राला अर्घ्य दिल्याने संतती सुख मिळते. यासोबतच शारीरिक समस्याही दूर होतात.

हे संकष्ट व्रत मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्त होण्यासाठी केले जाते. चैत्र महिन्यातील या चतुर्थीला व्रत आणि उपासना केल्याने समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते.