आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Dharm
  • Sankashti Chaturthi On November 12 | According To The Puranas, A Vow That Protects From Calamities And Bestows Prosperity | Marathi News

संकष्टी चतुर्थी 12 नोव्हेंबरला:पुराणानुसार, संकटांपासून वाचवणारे आणि समृद्धी देणारे व्रत

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 12 नोव्हेंबरला कार्तिक कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी आहे. स्कंद आणि ब्रह्मवैवर्त पुराणानुसार या तिथीला श्रीगणेशाची विशेष उपासना करून उपवास केल्यास समस्या दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीनुसार श्रीगणेशाची पूजा केली जाते. त्यांच्या नावानुसार हे व्रत आहे. म्हणजेच सर्व दुःख दूर करणारे मानले जातात. असे मानले जाते की, या दिवशी श्रीगणेशाची पूजा आणि उपवास केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात. तसेच अविवाहित मुली देखील चांगला नवरा मिळावा म्हणून दिवसभर उपवास करून संध्याकाळी श्रीगणेशाची पूजा करतात.

व्रत विधी : फक्त फलाहार आणि दूध घेऊ शकता
सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्याला जल अर्पण करून श्रीगणेशाचे दर्शन घ्यावे. श्रीगणेश मूर्तीसमोर बसून दिवसभर व्रत आणि उपासनेचा संकल्प घ्यावा. या व्रतामध्ये दिवसभर फळे आणि दूध घ्यावे. अन्न खाऊ नये. हे व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात. श्रीगणेशाची पूजा सकाळी आणि संध्याकाळी करावी. संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर व्रत पूर्ण करावे.

पूजन विधी : प्रथम श्रीगणेशपूजा आणि नंतर चंद्राला अर्घ्य
पूजेसाठी पूर्व-उत्तर दिशेला चौरंगावर श्रीगणेशाची मूर्ती स्थापित करावी. प्रथम चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र टाकावे. श्रीगणेशाच्या मूर्तीला जल, अक्षत, दुर्वा, मोदक, पान, धूप इत्यादी अर्पण करावे.

अक्षता आणि फुले घेऊन श्रीगणेशाकडे तुमची इच्छा सांगा आणि त्यानंतर ऊँ गणपतये नमः या मंत्राचा जप करून श्रीगणेशाला नमस्कार करावा. यानंतर चंद्राला मध, चंदनमिश्रित दुधाने अर्घ्य अर्पण करावे. पूजेनंतर प्रसाद स्वरूपात मोदक खावा.

बातम्या आणखी आहेत...