आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकारात्मक:जगामुळे संस्कार नव्हे, तर हे जग संस्कारामुळे बनत

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगात बदल घडवून आणण्यासाठी आपली मूल्ये बदलावीत. आतील जग बदलण्याचे नियंत्रण आपल्याकडे आहे. ही आपली निवड, आपली शक्ती आहे.

आपण परिवर्तन हा शब्द ऐकतो तेव्हा आपले लक्ष जगाकडे, लोकांकडे किंवा स्वत:कडे जाते. हा बदल सर्वत्र होत आहे, बाहेर-सभोवताली आणि आपल्या आतही. बदल हा जगाचा नियम आहे, हे आपण आपण ऐकत आलो आहे, परंतु त्याकडे आपले लक्ष कुठे जाते! आपण निवडू शकतो अशा कोणत्या बदलावर आपले नियंत्रण आहे हेही महत्त्वाचे आहे.

अनेकदा आपण बाहेरील बदलाचा आपल्यावर परिणाम होतो, असे समजतो. बाह्य गोष्टी आपल्यानुसार नसतात तेव्हा आपण निश्चित आयुष्य जगण्याच्या मार्गावर आलेलो असतो व मग अचानक अशी मोठी गोष्ट (कोरोना) आली. हे किती काळ टिकेल हेही आपल्याला माहिती नाही. अचानक बाहेरचे जग बदलले, त्याचा परिणाम आपल्या कामाच्या पद्धतीवर, अर्थव्यवस्थेवर आणि लोकांच्या वागण्यावरही झाला. काही लोक आधी शांत राहत होते, आता अचानक रिअॅक्ट होतात. कोणाला रडू येतेय, तर कोणी रागावत आहे.

हे सर्व बदल बाह्य जगात होत होते तेव्हा आपले लक्ष लोकांना नीट कसे करावे, परिस्थिती कशी सुधारावी याकडे लागले. यात आपली चांगली भावना, चांगला हेतू होता; पण आपण आपल्या आंतरिक जगातील विचार, भावनांकडे लक्ष दिले नाही. कारण आपण म्हणालो, बाहेर जे होतेय त्याचा परिणाम आपल्या आतील जगावर होतोय. पण आतील बदल कोणत्या दिशेने व्हावा, ही आपली निवड होती. आपण म्हणालो की, भीती, चिंता व संताप नैसर्गिक आहेत आणि आपणही त्याच दिशेने गेलो. आपल्यात बदल झाला, कारण बाहेर बदल झाला. भीती ही आपली नैसर्गिक भावना बनली. हा बदल आंतरिक जगात झाला तेव्हा बाह्य परिस्थितीवर परिणाम होऊ लागला. आपण बाहेर भरपूर मेहनत घेत आहोत, एकमेकांची काळजी घेत आहोत, पण आपण कोणती कंपने पसरवत आहोत? आपण त्याकडे लक्ष दिले नाही, कारण आपण म्हटले की, हे स्वाभाविक आहे.

जीवनाची काही आध्यात्मिक समीकरणे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. आत्म्याचा निसर्गावर प्रभाव पडतो हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. संकल्पाने जग निर्माण होते. आतील जग हे बाह्य जग निर्मा करते. हे समीकरण आहे. पण जेव्हा आपण ते विसरलो तेव्हा आपल्याला वाटले की, बाहेरील बदल आतील बदल घडवून आणतात. जेव्हा जेव्हा बाहेर बदल होतो तेव्हा आपल्याकडे एक पर्याय असतो. आपण जसे आहोत तसे राहू शकत नाही, परंतु हे लक्षात ठेवले पाहिजे की आपला बदल बाहेरील बदलांवर परिणाम करेल. हे समीकरण योग्य असणे फार महत्त्वाचे आहे. जगामुळे संस्कार नव्हे, तर संस्कारामुळे हे जग बनते. जगात जो बदल घडवून आणायचा आहे त्यासाठी आपली मूल्ये बदलली पाहिजेत. आतील जग बदलण्याचे नियंत्रण आपल्याकडे आहे. ही आपली निवड आहे, ही आपली शक्ती आहे. परंतु, आपण ही शक्ती वापरत नाही, तेव्हा आपण इतर दिशेने जाऊ लागतो.

समजा तुमच्या जवळच्या व्यक्तीमध्ये अचानक बदल झाला आहे. आता आपण काळजी घेतली नाही तर तुमच्यातही परिवर्तन होईल, परंतु ते योग्य दिशेने असणार नाही. आपल्याला वाईट वाटेल, आपण दुखावू, नाराज होऊ, मोठ्या आवाजात बोलायला लागू, पण विश्वास तुटेल. हा बदल बाहेर झाला तेव्हा आपल्या आतही बदल झाला, परंतु आपण ते जाणीवपूर्वक (कॉन्शियसली) निवडले नाही, आपली शक्ती वापरली नाही, स्वतःमध्ये योग्य बदल केला नाही.

तर आपोआप झालेला बदल दुसऱ्या दिशेने होता व हा बदल आपल्या संस्कृतीवर, जगावर परिणाम करतो. पूर्वी ते बदलले होते, आता आपणही बदललो आहोत व आपल्या संस्काराचा आपल्या जगावर परिणाम झाला, मग आपले नातेही बदलले. नात्याचा पाया हादरला. तेव्हा आपण जबाबदार कोणाला धरले? समोरच्याला. ते बदलले आहेत हे खरे, पण हेही खरे आहे की आपणही बदललो. आपला बदल योग्य दिशेने असता, तो जाणीवपूर्वक निवडला असता तर आपले जग, ते नाते वेगळ्या दिशेने गेले असते.

बी. के. शिवानी
ब्रह्मकुमारी

बातम्या आणखी आहेत...