आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यातील पहिले व्रत:सोमवारी सफला एकादशी, दुःख आणि दुर्भाग्य दूर करण्यासाठी युधिष्ठिराने केले होते व्रत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मार्गशीर्ष मासातील कृष्ण पक्षातील एकादशी सोमवार, १९ डिसेंबर रोजी आहे. पुराणात याला सफला एकादशी असे नाव देण्यात आले आहे. म्हणजेच हे व्रत केल्याने मनुष्याला लवकर पुण्य प्राप्त होते. सुख-समृद्धी आणि सौभाग्य प्राप्तीची इच्छा ठेवून हे व्रत केले जाते. या दिवशी भगवान श्रीविष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. महाभारत काळात युधिष्ठिराने या एकादशीचे व्रत केले होते.

देवाला पिवळी फुले व फळे अर्पण करा
या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. त्यानंतर व्रत आणि उपासनेचा संकल्प घ्यावा. त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून पिवळी फुले, फळे आणि चंदनाने भगवान श्रीविष्णूची पूजा करावी. गाईच्या दुधाने भगवान श्रीविष्णूला अभिषेक करावा. त्यानंतर शंखात गंगेचे पाणी भरून स्नान घालावे. यानंतर भगवान श्रीविष्णूला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे.

तुळशीमिश्रित पंचामृत अर्पण करावे. व्रताच्या दिवशी भगवान श्रीविष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी विष्णु सहस्त्रनामचा पाठ करावा. या दिवशी ॐ नमो भगवते वासुदेवाय, ॐ ह्रीं श्री लक्ष्मीवासुदेवाय नमः, ॐ नमो नारायणाय यांचा जप करा.

उपवासाचे पौराणिक महत्त्व
युधिष्ठिराने महाभारत काळात सफला एकादशीचे व्रत केले होते. ज्यामुळे सर्व प्रकारच्या दु:खांपासून मुक्ती मिळते. श्रीकृष्णाने त्यांना एकादशीचे महत्त्व सांगितले होते. एकादशीचे व्रत भक्तीभावाने व श्रद्धेने केल्याने भगवान श्रीविष्णू आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे.

एकादशी व्रताची कथा
प्राचीन काळी चंपावती या नगरीत महिष्मान नावाचा राजा होता. त्याच्या चार मुलांपैकी सर्वात मोठा लुंपक हा अतिशय दुष्ट होता. एके दिवशी राजा महिष्मानाने त्याला राज्यातून हाकलून दिले. तो जंगलात भटकून फळे खाऊन जगू लागला.

एके दिवशी नकळत त्याने काही फळे गोळा केली आणि ती पिंपळाच्या झाडाखाली ठेवली. त्यानंतर भगवान विष्णूंना विनंती केली की, या फळांनी देवाने प्रसन्न व्हावे. त्या दिवशी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील सफाळा एकादशी होती. अशा रीतीने दिवसभर फळे खाऊन भगवान विष्णूला फळे अर्पण करून नकळत एकादशीचे व्रत घडले.

यानंतर विष्णुजींच्या कृपेने लुंपकला राज्य, संपत्ती यांसह सर्व प्रकारची सुखे मिळाली आणि तो धार्मिक झाला. म्हणूनच असे मानले जाते की या व्रताचे पालन केल्याने दुःख आणि दुर्दैव नाहीसे होते.

बातम्या आणखी आहेत...