आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरक कथा:कामामधील समाधान हे संपत्तीपेक्षा मोठे आहे

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक लाकूडतोड्या होता. तो २०० रु. प्रतितासाप्रमाणे काम करत असे. एका सामाजिक संशोधकाने एक प्रयोग केला आणि लाकूडतोड्याला आपल्या बागेत काम करण्यासाठी दुप्पट मोबदला देईन, असे सांगितले. लाकूडतोड्या तयार झाला. संशोधकाने एक कुऱ्हाड दिली आणि सांगितले की, हे झाड काप, पण कुऱ्हाडीची धार असलेला भाग वापरायचा नाही. त्याच्या विरुद्ध बाजूचा भाग वापर. चकित लाकूडतोड्याने विचारले, ‘मग झाड कसे कापले जाईल?’ संशोधक म्हणाला, ‘त्यामुळे काही फरक पडणार नाही. मी तुला ४०० रु. प्रतितास देतोय.’ लाकूडतोड्या म्हणाला, ‘ठीक आहे, मला पैसे मिळण्याशी मतलब आहे.’

तो ५ दिवस झाडावर कुऱ्हाडीची उलटी बाजू मारत राहिला, पण झाडावर काहीही परिणाम झाला नाही. मग सहाव्या दिवशी तो संशोधकाकडे गेला व म्हणाला, ‘मी काम सोडतोय.’ संशोधक हसत म्हणाला, ‘पण मी तुला दुप्पट मोबदला देतोय.’ तेव्हा लाकूडतोड्या म्हणाला, ‘मला कामात मजा येत नाही. माझ्या कामामुळे काही बदल तर झाला पाहिजे. बदल होत नसेल तर मला काम करण्यात समाधान मिळणार नाही.’

तात्पर्य : काम करताना आनंद होत नाही तोपर्यंत कितीही पैसे मिळाले तरी समाधान मिळत नाही.

बातम्या आणखी आहेत...