आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपासना:आज वरुथिनी एकादशी, श्रीविष्णूंसोबतच करावी शनिदेवाची पूजा 

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • शनिदेवासाठी काळे तीळ दान करावेत, श्रीविष्णूंच्या या मंत्राचा करावा जप

शनिवार, 18 एप्रिलला चैत्र मासातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. यालाच वरुथिनी एकादशी म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी व्रत आणि पूजा केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शनिवार आणि एकादशी योगामध्ये भगवान विष्णूंसोबत शनिदेवाचीही पूजा करावी. येथे जाणून घ्या, एकादशीला कोणकोणते शुभ काम केले जाऊ शकतात.

श्रीविष्णू मंत्राचा जप करावा
एकादशीला ऊँ नमो भगवते वासुदेवाय नमः या विष्णू मंत्राचा कमीत कमी 108 वेळेस जप करावा. श्रीविष्णूंसोबतच देवी लक्ष्मीची पूजा करावी. दक्षिणावर्ती शंखामध्ये केशर मिश्रित दूध टाकून अभिषेक करावा. श्रीविष्णूंना पिवळे वस्त्र अर्पण करावेत. नैवेद्य दाखवावा.

शनिदेवाला तेल अर्पण करावे

शनिवारी आणि एकादशी योगामध्ये भगवान विष्णूंसोबतच शनिदेवाचीही विशेष पूजा करावी. या दिवशी काळे तीळ दान करावेत. गरजू व्यक्तींना धन, तेल, धान्य, चप्पल-बूट दान करावेत. शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून ऊँ शं शनैश्चराय नम: मंत्राचा 108 वेळेस जप करावा. शनिदेवाला तेल अर्पण करावे.

एकादशीला सकाळी लवकर उठावे

जे लोक एकादशीचे व्रत करतात त्यांनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यावा. व्रत करणाऱ्या व्यक्तीने या दिवशी अन्न ग्रहण करू नये, फलाहार करावा.

बातम्या आणखी आहेत...