आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रह्मा नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

शनिवार, 4 जुलै 2020 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. शनिवारी मूळ नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : ५

कार्यक्षेत्रात वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येण्याची शक्यता आहे. अनुभवी मंडळींचा सल्ला घेणे गरजेचे.

वृषभ : शुभ रंग : हिरवा | अंक : १

भागिदारी व्यवसायात काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होण्याची शक्यता आहे. देण्या-घेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता असणे गरजेचे. वाहन जपून चालवा.

मिथुन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८

आज काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. चांगली वैचारीक देवाणघेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. छान दिवस.

कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३

आज कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरी तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील. तब्येतीस जपा.

सिंह : शुभ रंग : मरून | अंक : ७

नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल.कामावर दांडी मारून करमणुकीस प्राधन्य द्याल.

कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९

सामाजिक कार्यात मानसन्मान वाढेल. कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी कराल.

तूळ : शुभ रंग : पिवळा | अंक : ४

आज तुम्हाला एखादी गुप्त बातमी समजेल. गृहिणींनी आज झाकली मूठ झकालीच ठेवणे गरजेचे आहे.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ६

राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्रभ्रमण अनपेक्षित पैसा मिळवून देईल. भाग्योदयाकडे वाटचाल होईल.

धनू : शुभ रंग : भगवा | अंक : १

मन काहीसे चंचल राहील. काम कमी व धावपळच जास्त होईल. आज हातचे सोडून मृगजळामागे धावाल.

मकर : शुभ रंग : निळा | अंक : २

पैसा येण्याइतकेच जाण्याचेही मार्ग प्रशस्त असतील. आज चैनी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे राहील.

कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ५

योग्यवेळी घेतलेल्या निर्णयांचे चीज होईल. व्यवसायात आवक पुरेशी असेल. मित्रमंडळींत मोठेपणा मिळेल.

मीन : शुभ रंग : आकाशी | अंक : ३

अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणेच हिताचे राहील. मित्रांच्या नादी लागूच नका.

0