आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शनि जयंती 22 मे रोजी:लॉकडाऊनमुळे शनिशिंगणापूरमध्ये यावर्षी भक्तांशिवाय साजरा होणार शनि जन्मोत्सव

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2019 मध्ये 2 लाख लोकांनी शनि जयंतीला घेतले होते शनिदेवाचे दर्शन शनिशिंगणापूर

शुक्रवार 22 मे रोजी शनि जयंती आहे. नॅशनल लॉकडाऊनमुळे यावर्षी चैत्र नवरात्र, रामनवमी, हनुमान जयंती आणि बुद्ध पौर्णिमेनंतर आता शनि जयंतीचा उत्सवही साधाच राहणार आहे. देशातील सर्वात प्राचीन शनि मंदिरात या वर्षी शनि जयंतीची धूम राहणार नाही. हजारो भक्त अभिषेक करण्यासाठी शनि जयंतीला येथे येतात परंतु यावर्षी लॉकडाऊनमुळे येथे केवळ एकच पुजारी शनिदेवाची पूजा-आरती करेल.

श्री शनैश्चर देवस्थान शनिशिंगणापूर ट्रस्टने शनि जयंतीची तयारी सूर केली आहे. अभिषेक-पूजन आणि शनि जन्मोत्सवाच्या सर्व प्रथा नेहमीप्रमाणे होतील. परंतु भक्तांना यावर्षी प्रवेश नाही. ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी अनिल धरंदळे यांच्यानुसार 2019 मध्ये शनि जयंतीला येथे जवळपास 2 लाख लोक आले होते. यावर्षी यापेक्षाही जास्त लोक येतील अशी आशा होती. परंतु लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसमुळे यावर्षी कोणताही मोठा उत्सव होणार नाही. फक्त एक पुजारी देवाची पूजा-आरती करेल. अशीच परंपरासुद्धा आहे.

दिवसभर होतील वेगवेगळे अभिषेक पूजन

शनि जयंतीला दिवसभर वेगवेगळ्या प्रकारे अभिषेक पूजेसहित इतर विविध प्रकारचे आयोजन होते. सकाळी 4 वाजता काकड आरतीने शनिदेवाचा जन्मोत्सव सुरु होईल. दिवसभर पूजा मंत्रजप आणि तेलाभिषेक करतील. संपूर्ण उत्सवात सोशल डिस्टेंसिंग आणि लॉकडाऊन नियमांचे पालन केले जाईल. यासाठी ट्रस्ट उपायोजना करत आहे. सकाळी 4 वाजता सुरु होणार उत्सव रात्री 11 पर्यंत चालेल.

बातम्या आणखी आहेत...