आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परंपरा:ज्येष्ठ अमावास्येला 22 तारखेला, घरामध्येच शनि पूजेसोबत पितरांसाठीसुद्धा करावे धूप-ध्यान

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्नान करताना पवित्र नद्यांच्या नावांचा उच्चार करावा, गरजूंना धान्य दान करावे

शुक्रवार, 22 मे रोजी शनि जयंती आहे. धार्मिक मान्यतेनुसार ज्येष्ठ मासातील अमावास्येला शनि देवाचा जन्म झाला होता. या तिथीला शनि पूजेसोबतच पितरांसाठीसुद्धा विशेष धुप-ध्यान करावे. उज्जैन के ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार प्रत्येक मासातील अमावास्येला पितरांसाठी श्राद्ध-तर्पण करावे. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान आणि दान-पुण्य करण्याची परंपराही आहे. सध्या नॅशनल लॉकडाऊन असल्यामुळे नदी स्नानापासून दूर राहावे. घरातच पवित्र नद्यांचे नाव घेऊन स्नान करावे.

पितरांसाठी धूप-ध्यान 

अमावस्या तिथीला एक कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये फुल आणि तीळ टाकावेत. त्यानंतर हे पाणी पितरांना अर्पित करावे. हातामध्ये पाणी घेऊन अंगठ्याच्या माध्यमातून अर्पण करावे. शेणाची गोवरी जाळून त्यावर गूळ-तूप टाकून धूप द्यावी. पितरांचे ध्यान करावे.

गरजू लोकांना दान करावे

अमावस्या तिथीला गरिबांना दान करावे, जेवू घालावे. सध्या लॉकडाऊन सुरु आहे आणि अनेक गरीब लोकांना अन्नासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीमध्ये तुमच्या जवळपास असलेल्या गरिबांना अन्नदान करावे. सामर्थ्यावर धन आणि वस्त्र दान करावे. उष्णतेपासून बचावासाठी छत्री आणि पायात घालण्यासाठी चप्पल-बूट दान करावे. 

शुक्रवार आणि अमावास्या योग

शुक्रवार आणि अमावस्या योगात सूर्यास्तानंतर तुळशीजवळ दिवा लावावा. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आरती करावी. पूजेमध्ये दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक करावा.

बातम्या आणखी आहेत...