आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपासना:शनि जयंतीला घरातच शनिदेवाच्या 10 नावांचा करावा उच्चार, दिवा लावून करा हनुमान चालीसा पाठ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिदेवाला अर्पण करावे निळे फुल, काळे तीळ आणि तेलाचे करा दान

आज शुक्रवार, 22 मे रोजी शनि जयंती आह. यावर्षी लॉकडाऊनमुळे शनिदेवाची सर्व मंदिरे बंद राहतील आणि अशा स्थितीमध्ये घरातच शनि पूजा करावी. पूजेमध्ये शनिदेवाच्या 10 नावांचा जप करावा. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ज्योतिषमध्ये शनीला क्रूर ग्रह सांगण्यात आले आहे. कुंडलीतील या ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी शनि जयंतीला तेल काळे तीळ दान करावे.

प्रमुख दहा नावे खालील प्रमाणे आहेत...

कोणस्थ पिंगलो बभ्रु: कृष्णो रौद्रोन्तको यम:।

सौरि: शनैश्चरो मंद: पिप्पलादेन संस्तुत:।।

अर्थ : 1- कोणस्थ, 2- पिंगल, 3- बभ्रु, 4- कृष्ण, 5- रौद्रान्तक, 6- यम, 7, सौरि, 8- शनैश्चर, 9- मंद 10- पिप्पलाद

या मंत्रामध्ये शनिदेवाची दहा नावे सांगण्यात आली आहेत. तुम्ही या मंत्राचा जप सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर करू शकता. घरातच किंवा मंदिरात जाऊन शनि पूजा करावी. त्यानंतर या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. मंत्र उच्चार योग्य पद्धतीने जमत नसल्यास शनिदेवाच्या 10 नावांचे 108 वेळेस स्मरण करावे. जप करण्यासाठी रुद्राक्ष माळेचा उपयोग करावा. शनिदेवाला निळे फुल अर्पण करावे.

शनि जयंतीला हनुमानाची विशेष पूजा करावी. हनुमान पूजेने शनि दोष दूर होतात. हनुमानाला शेंदूर लावून चमेलीचे तेल अर्पण करावे. दिवा लावून हनुमान चालीसाचा पाठ करावा.

बातम्या आणखी आहेत...