आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूजा-पाठ:शुक्रवारी शनि जयंती, राशीनुसार काय करावे आणि कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व 12 राशीच्या लोकांनी ऊँ शं शनैश्चराय नम: मंत्राचा जप करावा

शुक्रवार, 22 मे रोजी शनि जयंती साजरी केली जाईल. या दिवशी ज्येष्ठ मासातील अमावास्या राहील. या तिथीला पितरांसाठी विशेष धूप-ध्यान आणि पुण्य कर्म करावेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शनि जयंती आणि अमावस्येला आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे आणि गरजुंना सामर्थ्यानुसार दान करावे. सध्या लॉकडाऊन सुरु आहे आणि अनेक लोकांना अन्न मिळत नाहीये, अशा स्थितीमध्ये इतरांची मदत केल्यास शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते. गरिबांची निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या लोकांवर शनिदेव प्रसन्न राहतात.

शनि जयंतीच्या दिवशी सर्व 12 राशीच्या लोकांनी ऊँ शं शनैश्चराय नम: मंत्राचा जप करावा. हनुमानासमोर दिवा लावावा. येथे जाणून घ्या, शनि जयंतीच्या दिवशी राशीनुसार कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...

मेष

- इतरांना त्रास देऊ नये. सुंदरकांड किंवा हनुमान चालीसाचे पाठ करावेत. 

वृषभ

- स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचे नुकसान करू नये. शनि अष्टोत्तर शत नामावलीचे पाठ करावेत. 

मिथुन

- आई-वडिलांना नमस्कार करून दिवसाची सुरुवात करावी. शनिदेवाला काळी उडदाची डाळ अर्पण करावी. 

कर्क

- खोटे बोलू नये. राजा दशरथ कृत शनि स्तोत्राचे पाठ करावेत. 

सिंह

- व्यवसायात कोणाचाही गैरफायदा घेऊ नये. हनुमानाला वस्त्र अर्पण करावेत. 

कन्या

- या राशीच्या लोकांनी क्रोधापासून दूर राहावे. उपवास ठेवून शनि बिज मंत्राचा जप करावा. 

तूळ

- या राशीच्या लोकांनी निस्वार्थपणे लोकांची सेवा करावी. मोहरीच्या तेलाने शनिदेवाच अभिषेक करावा. 

वृश्चिक

- आळसापासून दूर राहावे आणि मेहनतीकडे दुर्लक्ष करू नये. हनुमान चालीसाचे पाठ करावेत आणि मुंग्यांना पीठ टाकावे 

धनु

- अत्याधिक उत्साहापासून दूर राहावे, मन शांत ठेवावे. पिंपळाच्या झाडाखाली ११ दिवे लावावेत. 

मकर

- या लोकांनी घरात शांतता ठेवावी. शनिदेवाच्या वैदिक मंत्राचा जप करावा. 

कुंभ

- हनुमानाची उपासना करावी आणि नीलम रत्न धारण करावे. 

मीन-

बजरंग बाण स्तोत्राचे पाठ करावेत आणि गरिबांना यथाशक्ती धान्य दान करावे.

बातम्या आणखी आहेत...