आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

श्रावण शनिवार:शनिप्रदोषला शिव पूजनाचे आहे विशेष महत्त्व, मानले जाते विशेष फलदायक

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनंत मोरे गुरुजी
व्रत-वैकल्यांचा, सण-उत्सवांचा आणि सात्त्विकतेचा काळ म्हणजे चातुर्मास. आषाढी एकादशीपासून चातुर्मासारंभ झाला आहे. नवचैतन्याची, उत्साहाची, सकारात्मक ऊर्जेची उधळण करणारा चातुर्मासातील पहिला महिना श्रावण होय. श्रावणात सणवारांची रेलचेल असते.

शनिवार, १ ऑगस्ट रोजी श्रावणातील पहिला प्रदोष आहे. शनी ही न्यायाची देवता मानली जाते. शिवाला त्रिमूर्तींमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. महादेव शिवशंकर शनी देवांचे आराध्य व गुरू आहेत. त्यामुळे या दिवशी दोघांचे पूजन करणे शुभ मानले जाते. श्रावणात शिवाच्या पूजनाचे महत्त्व अगदी वेगळे, विशेष आहे. प्रदोष म्हणजे सूर्यास्तानंतर रात्रीचा प्रारंभ होण्याचा काळ. अमरकोषानुसार प्रदोष म्हणजे रजनीमुख. ‘दोषा’ म्हणजे रात्र आणि प्रदोष म्हणजे ‘दोघे’चा प्रारंभ. भिन्नभिन्न मतांनुसार सूर्यास्तानंतर दोन, तीन वा सहा घटिका (१ घटिका = २४ मिनिटे) हा प्रदोषाचा काळ होय. पण सर्वसाधारणपणे प्रदोष काळ म्हणजे सायंकाळी सूर्यास्तापासूनची पुढे ३ घटिकापर्यंतची (सुमारे १ तास १२ मिनिटे) वेळ असे मानले जाते.

शिवपूजेच्या दृष्टीने प्रदोषकाळाचे (आणि विशेषत: त्रयोदशीच्या प्रदोषकाळाचे) महत्त्व अनन्यसाधारण असते. प्रदोषकाळी कैलासावर सर्व देव शिवाची पूजा करतात. प्रदोषव्रत नावाचे शिवाचे एक काम्यव्रतही आहे. या व्रतात त्रयोदशीला दिवसभर उपवास करून प्रदोषकाळी शिवपूजन केले जाते. विशेषतः शनिवारी, सोमवारी व मंगळवारी येणाऱ्या त्रयोदशींचे अनुक्रमे शनिप्रदोष, सोमप्रदोष, भौमप्रदोष हे विशेष फलदायक मानले जातात.