आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोजागरी:श्रीकृष्ण गोपिकांसोबत करतात रासक्रीडा आणि देवी लक्ष्मी करते पृथ्वीचे भ्रमण, या आहेत शरद पौर्णिमेशी संबंधित 4 प्रथा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार, 19 ऑक्टोबर आणि बुधवार 20 ऑक्टोबरला अश्विन मासातील शेवटची तिथी शरद पौर्णिमा आहे. या वर्षी पंचांग भेदामुळे ही पौर्णिमा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी साजरी केली जाईल. उज्जैनचे ज्योतषाचार्य, पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान आणि दान-पुण्य करण्याचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि जो व्यक्ती या दिवशी जागरण करतो त्याला लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

निधीवनामध्ये श्रीकृष्णाने गोपिकांसोबत करतात रासक्रीडा
द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाने शरद पौर्णिमेच्या रात्री गोपिकांसोबाबत रासक्रीडा केली होती. मान्यतेनुसार आजही शरद पौर्णमालेच्या रात्री श्रीकृष्ण सर्व गोपिकांसोबत वृंदावनामध्ये निधीवनात रासक्रीडा रचतात. हे क्षेत्र श्रीकृष्णाचे प्रमुख तीर्थस्थान आहे.

या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा
कोजागरी पौर्णिमेला घरात सत्यनारायणाची पूजा करून कथा ऐकावी. भगवान विष्णूंना केळीचा नैवेद्य दाखवावा. ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीची पूजा करून खाली दिलेल्या महालक्ष्मी मंत्राचा कमळ गट्टा माळेने 108 वेळेस जप करावा.

मंत्र - ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मयै नम:

चंद्राच्या किरणांमध्ये असते अमृत
शरद पौर्णिमेशी संबंधित विविध मान्यता प्रचलित आहेत. धार्मिक मान्यतेनुसार या रात्री चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात, जे विविध आजारांचा नाश करतात. याच कारणामुळे शरद पौर्णिमेला लोक घराच्या छतावर खीर ठेवतात ज्यामुळे चंद्राचे किरण त्या खिरेच्या संपर्कात येतात आणि त्यानंतर खीर सेवन केली जाते.

खीरशी संबंधित खास गोष्टी
शरद पौर्णिमेच्या रात्रीचा वैज्ञानिक दृष्टीकोन पाहिल्यास हा काळ ऋतू परिवर्तनाच्या सुरुवातीचा असतो. या दिवसानंतर शीत (हिवाळा) ऋतुचे आगमन होते. शरद पौर्णिमेच्या रात्री जागरण करून खीर खाणे हे या गोष्टीचे प्रतिक आहे की, शीत ऋतूमध्ये गरम पदार्थांचे सेवन करावे कारण यामुळे आपल्याला जीवनदायिनी उर्जा प्राप्त होते.

बातम्या आणखी आहेत...