आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा27 फेब्रुवारीपासून होलाष्टक सुरू झाले आहे. जे 7 मार्चपर्यंत राहील. होळीपूर्वी या दिवसांत शुभ कार्ये केली जात नाहीत. पण या दिवसांत खरेदी करण्यात दोष नसल्याचं जाणकार सांगतात. ज्योतिषशास्त्रीय ग्रंथानुसार खरेदी वर्षभर करता येते. ज्यासाठी काही तारखा, वेळा, नक्षत्र आणि शुभ योग निश्चित केले आहेत. या योगांमुळे होलाष्टकादरम्यान सर्व प्रकारच्या खरेदीसाठी हे सात दिवस शुभ राहतील.
दोन दिवस पुष्य नक्षत्राचा योग
या दिवसांमध्ये शुक्रवार आणि शनिवारी पुष्य नक्षत्र असेल. यामुळे शुक्र आणि शनि पुष्याचा योग जुळून येईल. हे शुभ नक्षत्र शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत राहील. अशा प्रकारे पुष्य नक्षत्रात खरेदीसाठी दोन दिवस शुभ ठरणार आहेत. या नक्षत्रात केलेली खरेदी दीर्घकाळ लाभदायक ठरते. त्यामुळे सुख-समृद्धी वाढते.
5 आणि 9 मार्च वगळता दररोज शुभ मुहूर्त
पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र आणि तिरुपतीचे डॉ. कृष्ण कुमार भार्गव सांगतात की, या वेळी होलाष्टक 9 दिवस राहील. ज्यामध्ये रविवार, 5 मार्च आणि 7 मंगळवारी शुभ मुहूर्त नाही.
या आठवड्यात तीन सर्वार्थसिद्धी आणि पाच रवियोग जुळून येतील. यासोबतच दोन दिवस पुष्य नक्षत्राचा योग राहील. दुसरीकडे, या दिवसांमध्ये वाहन खरेदीसाठी 4 विशेष शुभ मुहूर्त आणि मालमत्तेसाठी दोन शुभ दिवस असतील. शुभ योगांमध्ये केलेली गुंतवणूक, व्यवहार आणि खरेदी लाभदायक ठरेल.
होलाष्टकात खरेदीची मुहूर्त
तारीख आणि दिवस | मुहूर्त आणि शुभ योग |
27 फेब्रुवारी, सोमवार | सर्वार्थसिद्धि योग आणि वाहन खरेदीसाठी मुहूर्त |
28 फेब्रुवारी, मंगळवार | रवियोग |
1 मार्च, बुधवार | रवियोग आणि वाहन खरेदीसाठी मुहूर्त |
2 मार्च, गुरुवार | सर्वार्थसिद्धि, रवियोग, वाहन आणि प्रॉपर्टी खरेदीसाठी मुहूर्त |
3 मार्च, शुक्रवार | सर्वार्थसिद्धि योग, वाहन आणि प्रॉपर्टी खरेदीसाठी मुहूर्त |
4 मार्च, शनिवार | रवियोग आणि पुष्य नक्षत्र |
6 मार्च, सोमवार | रवियोग |
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.