आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पूजा-पाठ:श्रावण मासात शिवलिंगावर रोज अर्पण करावे बेलाचे पान, एकच बिल्वपत्र अनेक दिवस वारंवार धुवून अर्पण करू शकता

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवलिंगावर बेलाचे पान अर्पण करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी

मंगळवार 21 जुलैपासून महादेवाचा प्रिय महिना श्रावण सुरु होत असून या मासात शिवलिंगावर विविध प्रकराची पूजन सामग्री, फुल-पाने अर्पण केली जातात. यामध्ये बेलाच्या पानाच्या विशेष महत्त्व आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार बेलाचे झाड घराबाहेर किंवा घराजवळ असल्यास विविध वास्तुदोष दूर होतात. आयुर्वेदामध्येही याचे महत्त्व सांगण्यात आले आहे.]

उत्तर-पश्चिम (वायव्य) दिशेला लावू शकतात बेलाचे झाड
बेलाच्या झाड लावण्यासाठी घराची उत्तर-पाश्चिम दिशा शुभ राहते. ज्या घरात बेलाचे झाड लावून त्याला रोज पाणी घातले जाते, तेथे राहणाऱ्या लोकांच्या विचारांमध्ये सकारात्मकता राहते. उत्तर-पश्चिम दिशेला झाड लावणे शक्य नसल्यास घराच्या उत्तर दिशेलाही बेलाचे झाड लावू शकता.

शिवलिंगावर बेलाचे पान अर्पण करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी
शिवलिंगावर अर्पण केलेले बेलाचे पानं शिळे मानले जात नाही, हे पानं अनेक दिवसांपर्यंत वारंवार धुवून पुन्हा महादेवाला अर्पण केले जाऊ शकतात. यासोबतच कोणत्याही महिन्यातील अष्टमी, चतुर्दशी, अमवस्या, पौर्णिमा तिथीला बेलाची पानं तोडू नयेत. या व्यतिरिक्त सोमवारी बिल्वपत्र तोडू नयेत. या तिथींच्या एक दिवस अगोदर तोडलेल्या बेलाच्या पानांचा पूजेमध्ये उपयोग करू शकता.

बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्थान
शिवपुराणामध्ये बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्थान असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे बेलाच्या झाडाची पूजा शिव उपासना मानून विविध देवतांच्या पूजेचे पुण्य प्रदान करणारी मानली गेली आहे. विशेषतः हिंदू धर्म प्रथांमध्ये श्रावण महिन्यात महादेवाची उपासना करताना बिल्वपत्राचे महत्त्व अधिक आहे.