आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शिव महापुराण:श्रावण महिन्यात दान केल्याने कळत-नकळतपणे झालेल्या सर्व पापातून मिळू शकते मुक्ती

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रावण महिन्यात रुद्राक्ष दान केल्याने प्रसन्न होतात महादेव, सुख आणि वैभवही वाढते

श्रावण देवांचे देव महादेव यांचा सर्वात प्रिय महिना आहे. यावर्षी मंगळवार 21 जुलैपासून श्रावण मास सुरु होत आहे. या महिन्यात महादेवाच्या पूजेसोबतच दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. शिव पुराणानुसार, श्रावण महिन्यात केलेल्या दानामुळे प्रत्येक प्रकारचे सुख, वैभव आणि पुण्य प्राप्त होते. धर्म ग्रंथाचे जाणकार काशीचे पं. गणेश मिश्र यांच्यानुसार श्रावण महिन्यात कोणत्याही गोष्टीचे दान केल्याने अधिक पटीने पुण्य प्राप्त होते. या महिन्यात रुद्राक्ष, दूध, चांदीचा नाग, फळांचा रस आणि आवळा दान केल्याने कळत-नकळतपणे झालेले पापही नष्ट होतात. यासोबतच या महिन्यात वृक्षारोपण केल्याने पितर देवता प्रसन्न होतात. दान केल्याने जो आनंद मिळतो, त्यामुळे ईश्वर कृपा प्राप्त होते कारण देणे व्यक्तीला श्रेष्ठ आणि सत्कर्मी बनवते.

रुद्राक्ष दान केल्याने वाढते सुख आणि ऐश्वर्य
श्रावण महिन्यात महादेवाचा अभिषेक, शिवपुराण कथा वाचणे-ऐकणे आणि मंत्र जप व्यतिरिक्त दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात चांदीचे नाणे दान केल्याने किंवा चांदीपासून निर्मित नाग-नागीण शिवलिंगावर अर्पण केल्याने मिळणारे पुण्य कधीही समाप्त होत नाही. यामुळे ऐश्वर्य वाढते. महादेव मंदिरात वैदिक ब्राह्मणाला रुद्राक्ष माळ दान केल्याने सुख वाढते.

दीपदान समान आहे विद्या दान
श्रावण महिन्यात दीपदानाचेही विशेष महत्त्व आहे. दीप म्हणजे ज्ञान प्रकाश. प्रकाश देण्याची प्रेरणा दीप पूजनात आहे. याचा अर्थ आपण विद्या दान क्षेत्रातही संकल्पित होऊन उतरावे, ज्यामुळे महादेवाची कृपा आपल्याला प्राप्त होईल. श्रावण महिन्यात बिल्वपत्र, शमीपत्र, शिवलिंग आणि आवळ्याचे वृक्षारोपण दान करण्यासमान आहे.