आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावण मासारंभ:काठवेश्वर महादेव देशातील पहिले मंदिर, जेथे शिवलिंगाची नव्हे तर लाकडी घोड्याची पूजा

पाली : राकेश लिंबा/अशाेक सरगरा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक लाकडाचे, पितळ व चांदीचे घोडे येथे वाहतात

प्रत्येक शिवमंदिरात पार्वती, नंदी, गणेश, कार्तिकेय यांच्यासमवेत शिवलिंगाचे दर्शन होते. परंतु राजस्थानातील पालीजवळील गुडालास गावात काठवेश्वर महादेव मंदिरात या मूर्ती दिसून येत नाहीत. येथे फक्त काठ म्हणजे लाकडी घोड्याची महादेवाच्या रूपात पूजा केली जाते. ४७५ वर्षे प्राचीन या मंदिरास “पृथ्वीरा धणी अलखजी’ (पृथ्वीचे मालक) या नावानेही ओळखले जाते. 

भाद्रपद व शुक्ल पक्ष द्वितीयेला येथे जत्रा भरते. तेव्हा हजारोंच्या संख्येने भाविक येतात. कोरोनामुळे आता भाविक येत नाहीत. पण श्रावणी साेमवारला गर्दी दिसून येते. येथे नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक लाकडाचे, पितळ व चांदीचे घोडे येथे वाहतात, असे येथील पुजाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...