आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

21 जुलैपासून श्रावण सुरु:पती-पत्नीने एकत्र करावी महादेव, देवी पार्वती, श्रीगणेश, कार्तिकेय स्वामी आणि नंदीची पूजा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिव कुटुंबाचा फोटो घरात उत्तर दिशेला लावावा, वाढेल सुख-समृद्धी

मंगळवार 21 जुलैपासून श्रावण महिना सुरु होत आहे. या महिन्यात महादेवाची उपासना करण्याचे विशेष महत्त्व आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार नियमितपणे महादेवाची पूजा केल्यास घरात सुख-शांती आणि वातावरणही पवित्र राहते. शिवपुराणानुसार महादेवाच्या इच्छेनेच या संपूर्ण सृष्टीची ब्रह्मदेवांनी रचना केली आहे.

उत्तर दिशेला लावावा महादेवाचा फोटो
शिवपुराणानुसार, महादेवांचा निवास उत्तर दिशेला कैलास पर्वतावर आहे. या दिशेला महादेवाची मूर्ती स्थापित करणे किंवा फोटो लावणे शुभ राहते. यासोबतच देवी पार्वती, श्रीगणेश, कार्तिकेय स्वामी आणि नंदीची मूर्तीही ठेवावी. संपूर्ण शिव कुटुंबाची एकत्र पूजा केल्यास सकारात्मक फळ लवकर प्राप्त होते. महादेवाचा फोटो लावण्यात येणारी जागा स्वच्छ असावी. अस्वच्छ ठिकाणी फोटो लावू नये.

पती-पत्नीने एकत्र करावी शिव-पार्वती पूजा
वैवाहिक जीवनाशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी पती-पत्नीने घरात संपूर्ण शिव कुटुंब ठेवावे. शिव कुटुंबाची पूजा केल्यास पती-पत्नीमधील प्रेम कायम राहते. घरामध्ये मोठ्या आकाराचे शिवलिंग ठेवू नये. देवघरात अंगठ्याच्या आकाराएवढे किंवा यापेक्षा लहान शिवलिंग ठेवावे. देवघरात सकाळ-संध्याकाळ दिवा लावावा.

महादेवाच्या क्रोधीत स्वरूपाच्या फोटोची पूजा करण्यापासून राहावे दूर 
ज्या फोटोमध्ये महादेव प्रसन्न मुद्रेमधील असतील असा फोटो घरात लावावा. नंदीवर विराजित किंवा ध्यानमग्न असलेला महादेवाचा फोटोही लावू शकता. महादेवाचे क्रोधीत स्वरूप फोटो घरात लावू नये. महादेवाच्या क्रोधीत स्वरूपात फोटो घरात लावल्यास कुटुंबात अशांती वाढू शकते. महादेव तांडव करत असलेला फोटो घरात कधीही लावू नये.