आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

उपासना:बेलाची तसेच शमीच्या झाडाची पानेही शिवलिंगावर करावीत अर्पण, घर-कुटुंबात राहील सुख-समृद्धी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवलिंगावर शमीची पाने अर्पण करताना करावा या मंत्राचा उच्चार

सध्या पवित्र श्रावण मास सुरु आहे. या महिन्यात महादेव, देवी पार्वती, श्रीगणेश, कार्तिकेय स्वामी, नंदी यांची विशेष पूजा केली जाते. देवाच्या प्रसन्नतेसाठी व्रत केले जाते. पूजेमध्ये विविध प्रकारच्या सामग्रीचा वापर होतो. यामध्ये फुले आणि पानेही शिवलिंगावर अर्पण केली जातात. शिवलिंगावर बिल्वपत्र आणि धोतरा जास्त प्रमाणात अर्पण केला जातो. यासोबतच शमीच्या झाडाची पानेही शिवलिंगावर अर्पण करावीत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शिव पूजेमध्ये फुल-पाने अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. येथे जाणून घ्या शमीच्या पानांविषयी काही खास गोष्टी... 

शमीचे झाड पूजनीय आणि पवित्र मानण्यात आले आहे. घरामध्ये शमीचे झाड लावल्याने सर्व शनी दोष दूर होऊ शकतात. यासोबतच शमीच्या झाडाची पाने शिवलिंगावर अर्पण केल्याने सौभाग्य कामना पूर्ण होते.श्रावणात शिव मंदिरात जाऊन किंवा घरातच तांब्याच्या कलशात गंगाजल, पांढरे चंदन, तांदूळ टाकावे. त्यानंतर ऊँ नम: शिवाय मंत्राचा जप करत शिवलिंगावर हे जल अर्पण करावे. तांब्याच्या कलशाने जल अर्पण केल्यानंतर शिवलिंगावर तांदूळ, बिल्वपत्र, पांढरे वस्त्र, जानवे आणि शमीची पाने अर्पण करावीत. शमीची पाने अर्पण करताना खालील मंत्राचा उच्चार करावा...

अमंगलानां च शमनीं शमनीं दुष्कृतस्य च।
दु:स्वप्रनाशिनीं धन्यां प्रपद्येहं शमीं शुभाम्।।

शमीची पाने अर्पण केल्यानंतर महादेवाची धूप-दीप दाखवून आरती करावी. अशाप्रकारे पूजा केल्याने घर-कुटुंबात सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होऊ शकते.