आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवपूजेत लक्षात ठेवा या गोष्टी:घरात किती मोठे शिवलिंग असावे, शिवलिंग खंडित झाल्यास काय करावे?

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवपूजेला समर्पित श्रावण महिना 27 ऑगस्टपर्यंत चालेल. यंदा श्रावण पौर्णिमा दोन दिवसांची असेल. त्यामुळे 11 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जाणार असून दुसऱ्या दिवशी 12 ऑगस्टला स्नान आणि दानाची पौर्णिमा असेल.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्या मते, श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. अनेकजण घरी शिवलिंगाची स्थापना करून पूजा करतात. ज्या लोकांच्या घरात शिवलिंग स्थापित आहे, अशा लोकांनी काही खास गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात.

घरामध्ये किती मोठे शिवलिंग स्थापित करावे
घरामध्ये शिवलिंग स्थापित करायचे असल्यास शिवलिंगाच्या आकाराकडे विशेष लक्ष द्यावे. मोठे शिवलिंग फक्त मंदिरातच असावे, लहान शिवलिंग घरासाठी शुभ असते. देवघरात ठेवण्यात येणाऱ्या शिवलिंगाचा आकार आपल्या अंगठ्यापेक्षा अधिक असू नये. याचा उल्लेख शिवपुराणात आहे. शिवलिंगासोबत श्रीगणेश, देवी पार्वती, कार्तिकेय स्वामी आणि नंदी यांच्या लहान मूर्ती ठेवाव्यात. शिव कुटुंबाची पूजा घरातील सर्व सदस्यांनी एकत्र मिळून केल्यास पूजेचे फळ लवकर प्राप्त होऊ शकते.

घरातील मंदिराभोवती स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. दररोज सकाळ संध्याकाळ शिवलिंगाजवळ दिवा लावावा. पूजा करावी. बेलाची पाने अर्पण करून नैवेद्य दाखवावा.

शिवलिंग खंडित झाल्यास काय करावे?
शिवलिंग हे शिवाचे निराकार रूप मानले जाते. शिवलिंगाला विशिष्ट आकार नसतो. शिवलिंग तुटले तरी ते पूजनीय आहे, त्याची पूजा चालू ठेवावी. महादेवाची मूर्ती तुटली असेल तर ती मंदिरातून काढून टाकावी. भंगलेल्या मूर्तीची पूजा करणे टाळावे.

घरामध्ये छोटे पारद शिवलिंग ठेवू शकता
पारद शिवलिंग म्हणजेच पाऱ्याचे बनलेले शिवलिंग अतिशय शुभ मानले जाते. शिवलिंग बनवण्यासाठी आधी पारा स्वच्छ केला जातो. यानंतर अनेक औषधे मिसळून द्रव पारा बांधला जातो. पारा घट्ट झाल्यावर त्यापासून शिवलिंग बनवले जाते. पाऱ्यासह शिवलिंग बनवण्याची प्रक्रिया अनेक दिवस चालते. पारद शिवलिंग हे इतर सर्व धातूंच्या शिवलिंगापेक्षा श्रेष्ठ मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...