आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणात पार्थिव पूजनाचे महत्त्व:कुष्मांड ऋषीचे पुत्र मंडप यांनी सुरु केली होती पार्थिव पूजेची परंपरा, यामुळे वाढते आयुष्य आणि समृद्धी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी 9 ऑगस्ट सोमवारपासून श्रावण मास सुरु होत आहे. श्रावण मास महादेव उपासनेचा महिना मानला जातो. यामुळे या काळात पार्थिव शिवलिंग बनवून शिव पूजन केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. शिवपुराणात पार्थिव शिवलिंगाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. कलीयुगात कुष्मांड ऋषींचे पुत्र मंडप यांनी पार्थिव शिव पूजन सुरु केले होते. शिव महापुराणानुसार पार्थिव पूजनाने धन, धान्य, आरोग्य आणि पुत्र प्राप्ती होते. यासोबतच शारीरिक आणि मानसिक कष्टातून मुक्ती मिळते.

पार्थिव पूजेचे महत्त्व
पार्थिव पूजनाने अकाली मृत्यूची भीती संपते. शिव उपासनेसाठी सर्व लोक पार्थिव पूजा करू शकतात, मग तो पुरुष असो वा स्त्री. सर्वांना माहीत आहे की, शिव हे कल्याणकारी आहेत. जो पार्थिव शिवलिंग बनवून भगवान शिवची पूजा करतो, तो दहा हजार कल्पपर्यंत स्वर्गात राहतो. शिवपुराणात लिहिले आहे की, पार्थिव पूजा सर्व दुःख दूर करून सर्व इच्छा पूर्ण करते. पार्थिव उपासना दररोज केल्यास या जगात तसेच परलोकात अखंड शिवभक्ती प्राप्त होते.

पार्थिव पूजा कशी करावी
पूजेपूर्वी पार्थिव लिंगाचे निर्माण करावे. यासाठी नदी किंवा तलावातील माती, शेण, गूळ, लोणी आणि भस्म मिसळून शिवलिंग बनवा. शिवलिंग बनवताना हे लक्षात ठेवा की, ते 12 अंगुलपेक्षा जास्त मोठे नसावे. जर यापेक्षा जास्त असेल तर उपासनेचे पुण्य प्राप्त होत नाही. इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवलिंगाला प्रसाद अर्पण करावा. शिवलिंगाला स्पर्श झालेला प्रसाद ग्रहण करू नये.

पहिले या देवांची पूजा करावी
शिवलिंग बनवल्यानंतर श्रीगणेश, भगवान विष्णू, नवग्रह आणि माता पार्वती इत्यादींचे आवाहन करावे. त्यानंतर विधिव्रत षोडशोपचार करावे. पार्थिव बनवल्यानंतर, त्याला सर्वोच्च ब्रह्म मानून त्याची उपासना आणि मनन करा. पार्थिव शिवलिंग सर्व इच्छा पूर्ण करते. कुटुंबातील सर्व सदस्यांनी पार्थिव शिवलिंग बनवून त्याची शास्त्रीय पद्धतीनुसार पूजा केल्याने कुटुंब आनंदी राहते.

आजाराने ग्रस्त लोकांनी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा
पार्थिव शिवलिंगासमोर बसून सर्व शिव मंत्रांचा जप केला जाऊ शकतो. आजाराने ग्रस्त लोक महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकतात. दुर्गा सप्तशतीच्या मंत्रांचा जपही करता येतो.

बातम्या आणखी आहेत...