आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणात 4 सोमवार:29 जुलै ते 27 ऑगस्टपर्यंत असेल श्रावण महिना; जाणून घ्या, शिवलिंगावर कोणत्या गोष्टी विशेष अर्पण कराव्यात

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 14 जुलैपासून महदेवाचा प्रिय महिना श्रावण सुरू होत आहे. या महिन्यात शिव पूजनाचे विशेष महत्त्व आहे. हा महिना 27 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यंदा श्रावण महिन्यात चार सोमवार असतील. पहिला सोमवार 1 ऑगस्ट, दुसरा 8, तिसरा 15 ऑगस्ट आणि चौथा 22 ऑगस्ट रोजी असेल. या दिवसांमध्ये शिवलिंगावर चांदीच्या किंवा पितळेच्या कलशाने दूध अर्पण करावे. याशिवाय जल, बेलाची पाने, रुईची फुले, धोत्रा, भांग, चंदन, मध, भस्म आणि जानवे अर्पण करावे.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्या मते, 9 आणि 24 ऑगस्टला श्रावणात दोन प्रदोष व्रत आहेत. 9 ऑगस्टचा प्रदोष मंगळवारी आहे. त्याला भौम प्रदोष म्हणतात. या तिथीला शिव आणि देवी पार्वतीला अभिषेक करावा.

या महिन्यात रक्षाबंधन 11 ऑगस्टला आणि स्नान आणि दानाची पौर्णिमा 12 ऑगस्टला असेल. महिन्यात अनेक शुभ योग जुळून येतील. 1 ऑगस्ट, 4, 6, 7, 8, 10, 11 ऑगस्टला रवि योग असेल.

श्रावण महिन्यात या गोष्टी लक्षात ठेवा
श्रावण महिन्यात सकाळी लवकर उठावे. स्नानानंतर तांब्याच्या भांड्यातून सूर्याला जल अर्पण करावे. यानंतर घरातील मंदिरात किंवा इतर कोणत्याही शिवमंदिरात पूजा करावी.

या महिन्यात खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी. हिरव्या पालेभाज्यांबाबत विशेष काळजी घ्यावी. पावसाळ्याच्या दिवसात या भाज्यांमध्ये किडे येतात. उकळलेले पाणी प्यायल्यास बरे होईल.

जर तुम्हाला शिवमंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीच शिवलिंगाचा अभिषेक करू शकता. ज्यांच्या घरात शिवलिंग नाही, ते अंगणातील कोणत्याही रोपाला शिवलिंग मानून किंवा मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करू शकतात. मातीच्या शिवलिंगाची पूजा करण्याला पार्थिव शिवपूजा म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...