आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनि पर्व:श्रावण शनिवारी शनि पूजेचा संयोग, या दिवशी गरजू लोकांना दान केल्याने कमी होईल शनिदेवाचा अशुभ प्रभाव

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

6 ऑगस्टला श्रावणातील शनिवार आहे. पुराणात या दिवसाला शनिपर्व असेही म्हणतात. शिव पूजनाच्या या महिन्यात या शनिवारी शनिदेवाची पूजा करून गरजू लोकांना दान केल्याने शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी होतो. सध्या शनि स्वतःच्या राशीत म्हणजेच मकर राशीत आहे. या संयोगात केलेल्या उपासना आणि दानाचे पुण्य फळही अधिक वाढते.

या शुभ योगात शिवपूजाही विशेष फलदायी ठरेल. या दिवशी गरजू लोकांना कपडे, पादत्राणे किंवा इतर आवश्यक वस्तू दान केल्याने शनिदोष कमी होतो. शनिवारी शुक्ल, शुभ आणि रवि योग असतील. त्यामुळे या शुभ संयोगात केलेल्या कार्यात यश मिळण्याची शक्यता अधिक वाढेल.

श्रावणाचा शनिवार का आहे खास?
पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र सांगतात की, श्रावण महिन्यात सोमवार व्यतिरिक्त पुराणांमध्ये शनिवारचा दिवसही विशेष आहे. या दिवशी शनिदेव व्यतिरिक्त हनुमान आणि भगवान नृसिंहाची पूजा करण्याचाही नियम आहे. स्कंद पुराणात सांगितले आहे की, श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी या तीन देवतांची पूजा केल्यास सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. या दिवशी हनुमान आणि शनिदेवाला तेलाचा अभिषेक करावा. त्याचबरोबर भगवान नृसिंहाची विशेष पूजा केल्यानंतर तिळापासून बनवलेले भोजन ब्राह्मणांना दिल्यास मनोकामना पूर्ण होतात.

शनि आणि शिवपूजा : भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत. महादेवानेच शनिदेवाला न्यायाधीशपद दिले होते. त्यामुळे शनिदेव मनुष्याला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. त्यामुळे श्रावण महिन्यात शनिदेवासह भगवान महादेवाची पूजा केल्यास शुभ फळ मिळते. भगवान शिवाचे अवतार पिप्पलाद, भैरव आणि रुद्रावतार हनुमानाची पूजा देखील शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून रक्षण करते.

गरजूंना अन्न, कपडे आणि पादत्राणे दान करा
श्रावण महिन्यातील शनिवारी उपवास, पूजा आणि दान केल्याने शनिदोष दूर होतात. शारीरिक समस्या दूर होतात. या दिवशी गरजू लोकांना कपडे आणि अन्नधान्य दान केल्याने तसेच चप्पल दान केल्याने कळत-नकळत केलेली पापे नष्ट होतात.

डॉ. मिश्र यांच्यानुसार शनिदेवाचा रुद्राभिषेक आणि तेलाभिषेक केल्यानंतर चांदीच्या नाग-नागिणीची पूजा करून ते ते पवित्र नदीत प्रवाहित करावेत. पितृदोषही शिवाची पूजा केल्याने संपतो. यासोबतच शनिदेवाला तेलाचा अभिषेक केल्याने सर्व प्रकारच्या समस्याही दूर होतात.

बातम्या आणखी आहेत...