आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

श्रावण:शुक्रवारची कहाणी मानवी मनोवृत्ती प्रतिबिंबित करणारी

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

श्रीपाद पांडव गुरुजी, बीड
श्रावण आला की पहिल्या शुक्रवारी भिंतीवर केशराने अथवा गंधाने जिवतीचे चित्र काढतात. घराघरात भिंतीवर मुलालेकरांच्या गराड्यात रमलेल्या जिवतीचा कागद लावतात. पूजा करतात. तेरड्याआघाड्याची पानेफुले आणि दूर्वांची माळ करून देवीला घालतात. कणकेचे पाच दिवे करून देवीला ओवाळतात. ‘माझे बाळ जिथे आहे त्या दिशेला मी अक्षता टाकतेय, हे जिवतीआई, तू त्याचे रक्षण कर’ अशी मनोमन प्रार्थना करतात. पुरणावरणाच्या जेवणाने पूजेची सांगता करतात. शुक्रवारची कहाणी माणसाच्या मनातील वृत्तींना प्रतिबिंबित करणारी. ती आजच्या समाजमनाचे रूप दाखवते.

‘बाबा हे माझे जेवण नाही, हे या लक्ष्मीचे भोजन आहे...’ असे सांगून बहिणीने उद्दाम झालेल्या श्रीमंत भावाचे डोळे उघडले. श्रीमंतीच्या गर्वाने गरीब बहिणीचा अपमान करणारा भाऊ अन् भावाने अपमान केल्यामुळे स्वाभिमान व आत्मविश्वास जागृत झालेली बहीण. प्रयत्नांच्या पराकाष्ठेने परिस्थितीवर मात करता येते, त्यासाठी घेतलेला कष्टाचा वसा उतणार नाही, मातणार नाही, अशा भावनेने पूर्णत्वास न्यायचा. आता काळ बदललाय. मुलेबाळे मोठी होऊन सातासमुद्रापलीकडे जातात. जगाच्या पाठीवर कुठल्या तरी अनोळखी प्रांतात असलेले आपले बाळ सुखात असावे यासाठी तिची तळमळ असते. जगणे बदलले, रोजचे संदर्भ बदलले तरी आईची माया तशीच राहिली. ती तशीच राहो ही जिवतीकडे प्रार्थना.

Advertisement
0