आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोमवार, 8 ऑगस्टला श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे, तिला पुत्रदा एकादशी म्हणतात. शिवभक्तांसाठी श्रावण महिन्याचे महत्त्व खूप आहे. विशेषत: या महिन्यातील सोमवारी महादेवाची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. एकादशी आणि सोमवार योगात महादेवासोबतच श्रीविष्णूंची पूजा आणि मंत्रांचा जप अवश्य करावा.
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पुत्रदा एकादशीचे व्रत करून भाविक अपत्यसंबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवू शकतात. या व्रतामुळे मुलाच्या जीवनातील अडथळे दूर होऊन कुटुंबात सुख-शांती नांदते. पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून पूजा करावी.
अशा प्रकारे तुम्ही श्रीविष्णूंची पूजा करू शकता
दक्षिणावर्ती शंखाने भगवान श्रीविष्णू आणि महालक्ष्मीचा अभिषेक करावा. अभिषेकासाठी केशर मिश्रित दूध वापरणे अधिक शुभ राहते. दुधाने अभिषेक करून पाण्याचा अभिषेक करावा. देवाला नवीन वस्त्रे अर्पण करावेत. पूजा साहित्य अर्पण करावे. तुळशीची पाने टाकून नैवेद्य दाखवावा. धूप आणि दिवे लावून आरती करावी. मंत्राचा जप करावा.
शिवपूजेत बेलाच्या पानांसह शमीची पाने अर्पण करावीत
शिवपूजेमध्ये बेलाची पाने सहसा वापरली जातात, परंतु त्यासोबत शमीची पाने देखील देवाला अर्पण करावीत. शमीची पाने शिव, श्रीगणेश आणि शनिदेवाला अर्पण केली जातात. यासोबत फुले, गुलाब, धोत्रा, जानवे, तांदूळ इत्यादी वस्तू अर्पण करा. चंदनाचा टिळा लावावा. शिवलिंगाला फुलांनी सजवावे. मिठाई आणि हंगामी फळांचा नैवेद्य दाखवावा. ऊँ नमः शिवाय मंत्राचा जप करावा.
एकादशी व्रताशी संबंधित मान्यता
स्कंद पुराणातील वैष्णव खंडात वर्षातील सर्व एकादशींचे महत्त्व सांगितले आहे. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला एकादशीचे व्रत आणि त्यामुळे होणारे फायदे याबद्दल सांगितले होते. हे व्रत मुळात भगवान श्रीविष्णूसाठी केले जाते. मान्यतेनुसार जे लोक सर्व एकादशींचे व्रत करतात त्यांना आरोग्याबरोबरच धार्मिक लाभही मिळतात. आयुर्वेदात असे सांगितले आहे की, उपवास केल्याने आपण अन्न सोडतो आणि फळांचे सेवन करतो, ज्यामुळे आपल्या पचनसंस्थेला विश्रांती मिळते आणि पोटाशी संबंधित अनेक आजारांपासून बचाव होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.